'मुख्यमंत्री माझी शाळा' अभियानाचे बदलले निकष
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 11:57 IST2024-09-13T11:56:43+5:302024-09-13T11:57:30+5:30
Chandrapur : मागीलवर्षी निवड झालेल्या तसेच निम्न क्रमांकाच्या शाळा ठरणार अपात्र

Changed criteria of 'Chief Minister Majhi Shala' campaign
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' अभियानातील दुसरा टप्प्यातील बदललेल्या निकषानुसार १५० गुण केले. याशिवाय मागील वर्षी शाळांचा पुरस्कार प्राप्त झालेला क्रमांक किंवा त्यापेक्षा निम्न क्रमांकासाठी यावेळी विचार केला जाणार नाही. त्यामुळे नवीन शाळांना पुरस्काराची संधी मिळणार आहे. असे असले तरी दुसऱ्या टप्प्यात बदल केल्याने अशा शाळांना वरच्या स्तरावरील क्रमांक मिळण्याची धडपड करावी लागणार आहे.
शाळांचा भौतिक, शैक्षणिक विकासाबरोबरच पालक सहभाग वाढविण्यासाठी शासनाने 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' या अभियानाअंतर्गत शाळांना प्रोत्साहित करीत आहे. दुसऱ्या टप्प्यातील शाळांचे तालुकास्तरीय मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. केंद्रीस्तरीय ऑनलाइन मूल्यांकनासाठी सोडत पद्धतीने केंद्रप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली. केंद्रस्तरीय तसेच तालुकास्तरीय मूल्यमापनाची प्रक्रिया पूर्ण झाली. मात्र, शिक्षण विभागाकडून दुसऱ्या टप्प्यात बदल केला आहे. यामध्ये मागील वर्षी शाळांचा पुरस्कार प्राप्त झालेला क्रमांक किंवा त्यापेक्षा निम्न क्रमांकासाठी यावेळी विचार केला जाणार नाही. असा बदल केल्याने अशा शाळांचा वरचा टप्पा गाठण्यासाठी सध्या चांगलीच कसरत करावी लागत आहे.
मूल्यांकनात या बाबी ठरणार महत्त्वपूर्ण
मूल्यांकनात शाळास्तरावर स्काऊट गाइड, महावाचन चळवळ, अध्ययन निष्पत्ती, विविध समितीची अद्ययावतीकरण, शिक्षकांचा गुणात्मक विकास, क्षमतेनुसार वर्ग खोल्या, फर्निचर, आरोग्य सुविधा या बाबी पुरस्कारासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.
स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षकांची धडपड
- स्पर्धेत टिकण्यासाठी जिल्ह्यातील काही शिक्षकांनी धडपड सुरू केली आहे.
- लोकसहभाग वाढवून या माध्यमातून शाळांचा विकास केला जात आहे. आपल्याच शाळेचा नंबर यावा यासाठी शिक्षकांची बरीच धडपड सुरू आहे.