धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल

By admin | Published: October 13, 2016 02:18 AM2016-10-13T02:18:04+5:302016-10-13T02:18:04+5:30

शहरातील दीक्षाभूमी मैदान येथे १५ व १६ आॅक्टोबर रोजी धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Changes in the traffic system for the Dhamchachakra Supercrafts festival | धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल

धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल

Next

दोन दिवस कार्यक्रम : चंद्रपुरातील दीक्षाभूमीवर उतरणार निळ्या पाखरांचा थवा
चंद्रपूर : शहरातील दीक्षाभूमी मैदान येथे १५ व १६ आॅक्टोबर रोजी धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्या दरम्यान कायदा व सुव्यवस्था कायम रहावी म्हणून चंद्रपूर शहरातील दीक्षाभूमी परिसराकडे जाणाऱ्या रहदारीच्या मार्गात शनिवारी सकाळी ८ वाजतापासून सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.
नागपूरकडून चंद्रपूरकडे येणारी जड वाहने होटल कुंदन प्लाझा पलिकडेच थांबून राहतील. मूलकडून नागपूरकडे जाणारे जड वाहने एम.ई.एल नाका चौक येथेच थांबतील. बल्लारपूरकडून नागरपूरकडे जाणारे जड वाहने डी.आर.सी. बंकर, बायपास रोड येथेच थांबून राहतील. दीक्षाभूमी मार्गावरील जमावाची गर्दी पाहून आवश्यकतेनुसार प्रवेश बंदीमध्ये शिथीलता देण्यात येईल, असे पोलीस विभागाने कळविले आहे.
चंद्रपूर शहरातील दुचाकी व चारचाकी वाहनाकरिता रहदारी व्यवस्था जुना वरोरा नाका चौक ते आंबेडकर महाविद्यालय, मित्र नगर चौक, टी.बी. दवाखाना पर्यंतचा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनाकरिता (सायकल सहीत) बंद राहणार आहे. पाण्याची टाकी-विश्रामगृह- जुना वरोरा नाका हा मार्गही सर्व प्रकारच्या वाहनाकरिता बंद राहणार असून नागपूरकडून शहराकडे जाणारे वाहने (जड वाहने वगळून) हुतात्मा स्मारक चौक-जिल्हा स्टेडियम-मित्र नगर मार्ग किंवा जुना वरोरा नाका-उड्डाणपूल- सिद्धार्थ हॉटेल- बस स्टॅन्ड- प्रियदर्शिनी चौक मार्गे शहराकडे जातील.
रामनगर, मित्रनगर, आकाशवाणी, स्रेहनगर, वडगाव परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी पाण्याची टाकी- दवा बाजार- मित्र नगर चौक- आकाशावणी मार्ग आपले वाहने (जड वाहने वगळून) काढावीत. त्याचप्रमाणे जटपुरा गेटकडून रामनगर मार्ग जुना वरोरा नाकाकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी पाण्याची टाकी- प्रियदर्शिनी चौक- बस स्टॅन्ड- सिद्धार्थ हॉटेल- उड्डाणपूल मार्गे नागपूरकडे जातील.
दीक्षाभूमी येथे जाणाऱ्या बौद्ध बांधवाची गर्दी पाहता जुना वरोरा नाका, आयटीआय कॉर्नर, पत्रकार भवन, उड्डान पुल परिसर हा ‘नो पार्किंग व नो हॉकर्स झोन’ म्हणून घोषित करण्यात येत आहे. त्यामुळे या परिसरात कोणतेही वाहने, हॉकर्स, दुकाने लावण्यात येवू नये, असे पोलीस विभागाने कळविले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
येथे असणार वाहन पार्किंग व्यवस्था
न्यु इंग्लिश हायस्कूल क्रीडांगण, टी.बी. हॉस्पीटल मैदान मित्रनगर, आयटीआय कॉलेज, जनता कॉलेज समोरी पटांगणामध्ये दुचाकी व चारचाकी वाहन पार्किंग राहणार आहे. घोषित पार्किंग स्थळावरच वाहने पार्क करून वाहतूक व्यवस्थेचे पालन करावे, आवाहन करण्यात आले आहे.
खासगी ट्रॅव्हल्स्साठीही बंदी
सावरकर चौक मार्ग मूल, गडचिरोली कडे जाणाऱ्या व मूल, गडचिरोली कडून सावरकर चौक चंद्रपूर येथे प्रवासी घेवून येणाऱ्या सर्व खासगी ट्रॅव्हल्स प्रवासी बसेस सावरकर चौकाचे अलिकडेच खासगी ठिकाणाहून प्रवासी ने आण करतील. तर चंद्रपूर ते नागपूर करिता वरोरा नाका चौक-पाणी टाकी चौक-प्रियदर्शिनी चौक- बस स्टॉप-सावरकर चौक-कृषी कार्यालय जवळील तात्पुरता स्वरुपात असलेली ट्रॅव्हल्स स्टॅन्डपर्यंत जातील.

Web Title: Changes in the traffic system for the Dhamchachakra Supercrafts festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.