भाजपाध्यक्षाचा आरोप अवैध कामाला दाद न दिल्यानेच

By admin | Published: July 7, 2016 01:05 AM2016-07-07T01:05:22+5:302016-07-07T01:05:22+5:30

तालुका भाजपाचे अध्यक्ष होमदेव मेश्राम यांनी सूचविलेल्या अवैध कामाला दाद न दिल्यामुळे त्यांनी माझ्यावर अवैध मुरुम उत्खननाचा आरोप केला,

The charge of the BJP is not only due to rampant illegal work | भाजपाध्यक्षाचा आरोप अवैध कामाला दाद न दिल्यानेच

भाजपाध्यक्षाचा आरोप अवैध कामाला दाद न दिल्यानेच

Next

पत्रकार परिषद : मंजुषा लाडे यांची माहिती
नागभीड : तालुका भाजपाचे अध्यक्ष होमदेव मेश्राम यांनी सूचविलेल्या अवैध कामाला दाद न दिल्यामुळे त्यांनी माझ्यावर अवैध मुरुम उत्खननाचा आरोप केला, अशी माहिती वलनीच्या सरपंच मंजुषा लाडे यांनी नागभीड येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.
सरपंच लाडे माहिती देताना म्हणाला, तालुका भाजपाचे अध्यक्ष असलेले होमदेव मेश्राम यांच्या वडीलाच्या नावाने रोहयो अंर्गतग एक विहीर मंजूर करण्यात आली आहे. या विहिरीच्या देयकाचा प्रश्न जेव्हा माझ्यासमोर आला, तेव्हा झालेल्या कामाची बिले, मोजमाप पुस्तिका आणि मजुरांचा पूर्णपणे भरलेला हजेरीपट आणा आणि देयके घेवून जा, असे सांगितले.
माझ्याकडे फक्त १८ ते २४ मार्च २०१६ या कालावधीतील १२ मजुरांचा न भरलेला हजेरीपट ठेवण्यात आला. या हजेरीपटावर मजुरांच्या सह्या नाहीत. पण त्यावर ग्रामसेवक आणि रोजगार सेवकाने सह्या केल्या आहेत. हजेरीपुस्तिकेवर मी सह्या मारण्यास ठाम नकार दिला आणि म्हणूनच मेश्राम यांनी माझ्यावर अवैध मुरुम उत्खननाचा आरोप केल्याचे त्यांनी सांगितले.
मुरुमाचे अवैध उत्खनन कोणी केले, हे तपासण्याची जबाबदारी महसुल विभागाची आहे. त्याच वेळी हे अवैध मुरुम उत्खनन रोखून त्याचा पंचनामा करण्याची गरज होती. पण तसे न करता मी त्यांच्या अवैध कामाला दाद न दिल्यामुळे त्यांनी माझ्यावर अवैध उत्खननाचा आरोप केला, असे सरपंच लाडे यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.सतीश वारजूकर, पं.स.चे माजी सभापती खोजराम मरस्कोल्हे, उपसरपंच रवीकांत मुळेवार, सदस्य शालिनी राठोड, प्रमोद सडमाके, निता बोरकर, कान्हुजी ठाकरे, पिंगला गोंगले उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The charge of the BJP is not only due to rampant illegal work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.