चार वर्षांपासून तळोधी पशुवैद्यकीय दवाखाना प्रभारीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:30 AM2021-08-27T04:30:50+5:302021-08-27T04:30:50+5:30
तळोधी बाः नागभीड तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या तळोधी बा.येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी -१ गेल्या चार वर्षांपासून प्रभारी डाॅक्टर ...
तळोधी बाः नागभीड तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या तळोधी बा.येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी -१ गेल्या चार वर्षांपासून प्रभारी डाॅक्टर सांभाळत आहे. त्यामुळे पशुंचे हाल होत असून येथे स्थायी डाॅक्टर देण्याची मागणी गावकरी वर्गाच्या वतीने केली जात आहे.
पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी -१ येथे चार पदे असताना फक्त पट्टीबंधक म्हणून एस.व्ही. निखारे नियमित कामगिरी बजावत आहेत. तर मागील २०१७ पासून पशुवैद्यकीय प्रभारी डाॅ. डी.जी.टेकाम हे फक्त सोमवार, बुधवार व शुक्रवार असे तीन दिवस तळोधी बा.येथील दवाखान्यात राहतात. बाकीचे दिवस गिरगांव येथील दवाखान्यात असतात. त्यामुळे तळोधी बा.येथील दवाखान्यात स्थायी पशुवैद्यकीय डाॅक्टर नसल्यामुळे पाळीव जनावरे पाळत असलेल्या नागरिकांना जनावरावर वेळेवर उपचार करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पट्टीबंधकाच्या आधारावर जनावरावर उपचार करावे लागते. वेळेवर जनावरावर उपचार मिळत नसल्याने जनावर मरण्याचीसुध्दा भीती असते. तसेच याठिकाणी परिचरांचे दोन्ही पदे रिक्त असल्याने पशुवैद्यकीय दवाखान्याच्या परिसरात केरकचरा व घाण साचून राहत असल्याने दुर्गंधी येत असते. मात्र गेल्या चार वर्षांपासून संबंधित विभाग व लोकप्रतिनिधीकडे स्थायी पशुवैद्यकीय डाॅक्टर हवा म्हणून मागणी केली जात असतानासुध्दा याकडे लक्ष देण्यात येत नाही.
260821\img_20210826_115933.jpg
पशुवैदयकीय दवाखाना तळोधी बा