तपाळ योजना सहा दिवसांपासून बंद

By admin | Published: April 12, 2017 12:54 AM2017-04-12T00:54:44+5:302017-04-12T00:54:44+5:30

गेल्या सहा दिवसांपासून नागभीडसह ११ गावांना पाण्याचा पुरवठा करणारी तपाळ पाणी पुरवठा योजना बंद असल्याने ...

Check plan closes for six days | तपाळ योजना सहा दिवसांपासून बंद

तपाळ योजना सहा दिवसांपासून बंद

Next

नागभीड नगरपरिषद : शहराला टँकरने पाणीपुरवठा, महिलांची गर्दी
नागभीड : गेल्या सहा दिवसांपासून नागभीडसह ११ गावांना पाण्याचा पुरवठा करणारी तपाळ पाणी पुरवठा योजना बंद असल्याने या गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. यावर तोडगा म्हणून नागभीड नगरपरिषदेने टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा सुरू केला आहे.
तपाळ योजना गेल्या वर्षभरात अनेकदा बंद पडली. पण तेवढा प्रभाव यापुर्वी जाणवला नाही. मात्र आता सूर्य आग ओकत असल्याने प्रत्येकाची पाण्याची मागणी वाढली आहे. अशा परिस्थितीत गेल्या सहा दिवसांपासून ही योजना बंद आहे. नागभीड येथील बहुतेक नागरिक तपाळ योजनेवरच अवलंबून असल्याने या नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
लोकांची ही गरज लक्षात घेवून नागभीड नगरपरिषदेने ज्या प्रभागात पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे, अशा प्राभागात टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा सुरू केला आहे. सद्यास्थितीत एकाच टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असून शहराची व्याप्ती लक्षात घेता आणखी टँकर वाढवावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान तपाळ योजनेत निर्माण झालेला तांत्रिक बिघाड आणखी दोन दिवस दूर होणार नसल्याची विश्वसनीय माहिती आहे. सद्यास्थितीत निर्माण झालेल्या बिघाडावर थातूर मातूर उपाय न करता कायमस्वरूपी उपाय करूनच योजना सुरू करावी, जेणे करून पुन्हा योजना बंद पडणार नाही, याची खबरदारी तपाळ प्रशासनाने घेण्याची मागणीसुद्धा नागरिकांकडून केल्या जात आहे.सद्यस्थितीत नागभीड येथील प्रभाग क्र. ६ मधील मारीमोहल्ला, सिद्धीविनायक कॉलनी, विठ्ठल मंदिर बाजूचा भाग, प्रभाग क्र. ५ मधील कुरमार मोहल्ला, ठाकरे मोहल्ला, प्रभाग क्र. ४ मधील शिवनगर आदी विविध भागात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)

मिनरल वॉटरची मागणी वाढली
नागभीड येथील बहुतेक कुटुंब पिण्यासाठी तपाळ योजनेच्या पाण्याचा वापर करतात. पण गेल्या सहा दिवसांपासून ही योजना बंद आहे. परिणामी शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर उपाय म्हणून नागरिकांनी मिनरल वॉटरचा पर्याय शोधला आहे. नागभीड येथे मिनरल वॉटरची निर्मिती करणारे तीन प्रतिष्ठाने असून या प्रतिष्ठानांकडून २५ ते ३० रुपये प्रमाणे प्रतिष्ठान पाणी उपलब्ध करून देत आहे.

Web Title: Check plan closes for six days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.