छत्रपती चिडे यांच्या परिवाराला १० लाखांचा धनादेश सुपूर्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 10:25 PM2018-11-23T22:25:16+5:302018-11-23T22:25:35+5:30

महाराष्ट्र शासनाच्या वतीने नागभिडचे दिवंगत प्रभारी ठाणेदार छत्रपती चिडे यांच्या परिवाराला मुख्यमंत्री सहायता निधीतून गुरूवारी १० लाखांचा धनादेश प्रदान करण्यात आला.

Chhatrapati Chide's family handed over a check of Rs 10 lakh | छत्रपती चिडे यांच्या परिवाराला १० लाखांचा धनादेश सुपूर्द

छत्रपती चिडे यांच्या परिवाराला १० लाखांचा धनादेश सुपूर्द

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महाराष्ट्र शासनाच्या वतीने नागभिडचे दिवंगत प्रभारी ठाणेदार छत्रपती चिडे यांच्या परिवाराला मुख्यमंत्री सहायता निधीतून गुरूवारी १० लाखांचा धनादेश प्रदान करण्यात आला.
राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेवरून महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेरणार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, नगरसेवक सुभाष कासनगोट्टुवार, सुहास अलमस्त आदींच्या उपस्थितीत चिडे यांच्या कुटुंबियांना हा धनादेश देण्यात आला. ना. मुनगंटीवार यांनी दिवंगत पोलीस उपनिरीक्षक छत्रपती चिडे यांच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचे जाहीर केले आहे. तुकूम येथील शिवनगर अपार्टमेंटमधील चिडे कुटुंबाच्या घरी जाऊन ही मदत करण्यात आली. यावेळी अमिन शेख, राजू गोलीवार, संजय मुसळे, शीला चव्हाण, गणेश कुळसंगे, प्रदीप गडेवार, पुरूषोत्तम सहारे आदी उपस्थित होते.

Web Title: Chhatrapati Chide's family handed over a check of Rs 10 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.