सीएचपी बांधकामात कोट्यवधीचा फटका
By admin | Published: June 12, 2017 12:48 AM2017-06-12T00:48:01+5:302017-06-12T00:48:01+5:30
वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड बल्लारपूर अंतर्गत येणाऱ्या सास्ती कोळसा खाणीत १९९८ मध्ये नवीन सीएपीचे सुरू झालेले काम
नियोजनाअभावी करोडो रुपयांची यंत्रसामग्री धूळ खात
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड बल्लारपूर अंतर्गत येणाऱ्या सास्ती कोळसा खाणीत १९९८ मध्ये नवीन सीएपीचे सुरू झालेले काम मध्येच बंद करण्यात आल्याने वेकोलिला करोडो रुपयांचा फटका बसला आहे.
सास्ती कोळसा खाणीत नवीन सीएचपी कामाचा शुभारंभ १९९८ मध्ये करण्यात आला होता. या कामावर करोडो रुपये खर्च करण्यात आले. या ठिकाणी नवीन यंत्र सामग्री, सीएचपी स्ट्रम्पर तयार करण्यात आले. अचानक काम मध्येच बंद करण्यात आले. १९ वर्ष झाले अजूनपर्यंत सीएचपीचे काम पूर्ण झाले नाही. करोडो रुपये खर्च होऊनही त्या ठिकाणी सीएचपीचा नामोनिशान नाही. या सीएचपीकरिता आणलेली करोडो रुपयांची यंत्र सामग्री धूळ खात असून ९० टक्के यंत्र सामग्री सीएचपी साहित्य भंगार माफीयांनी चोरून विकून टाकले. वेकोलि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे वेकोलिला करोडोचा फटका बसला. सीएचपीचे काम बंद करण्याची चौकशी करणे गरजेचे आहे.
सास्ती येथे नवीन सीएचपीचे काम पूर्ण झाले असते तर जवळपास एक लाख टन कोळशाचा साठा करून ठेवण्याची सोय झाली असती आणि रेल्वे रॅकने लॅडीग झाली असती. आता रेल्वे रॅक लॅडिगकरिता ट्रक मालकाला पैसे मोजावे लागत आहे. शिवाय कोळसा चोरीवर आळा बसला असता. वेकोलिला फायदेशिर ठरणाऱ्या सीएचपीचे काम न झाल्यामुळे वेकोलिला याचा फटका बसत आहे. राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान पोहचविणाऱ्या वेकोलि अधिकाऱ्यांवर कारवाईची गरज आहे.
केवळ नियोजनाचा अभाव असल्याने हा सर्व प्रकार घडून येत आहे.
डम्पर रोडवरून डम्परच जाईना !
नियोजनाअभावी वेकोलि प्रशासनाला फटका बसत आहे. सास्ती खाण परीसरात लाखो रुपये खर्च करून डम्पर रोड तयार केले होते, त्यात डम्पर जात नसल्याची माहिती आहे. अनेक शेड जनावरांचे आश्रयस्थान झाले आहे. डोजर अनेक दिवसांपासून उभा असून लाखो रुपयाचे स्कॅपर मातीच्या ढिगाऱ्याखाली दबलेले आहे.