पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2017 01:23 AM2017-01-26T01:23:27+5:302017-01-26T01:23:27+5:30
भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ६७ वा वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम
Next
चंद्रपूर : भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ६७ वा वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम २६ जानेवारी रोजी सकाळी ९.१५ मिनीटांनी पोलीस मैदानाच्या प्रांगणात होणार आहे. राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)