मुख्यमंत्र्यांनी केले शहिदांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 12:23 AM2018-08-17T00:23:59+5:302018-08-17T00:26:31+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी चिमूर येथे शहीद स्मृती दिनी शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आले होते. शहरातील मुख्य मार्गावर असणाऱ्या हुतात्मा स्मारकाला त्यांनी भेट दिली. येथे त्यांनी शहिदांच्या स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर त्यांनी किल्ला परिसरातील शहिदांच्या स्मृती भवनाला भेट दिली.

Chief Minister greeted the martyrs | मुख्यमंत्र्यांनी केले शहिदांना अभिवादन

मुख्यमंत्र्यांनी केले शहिदांना अभिवादन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर/शंकरपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी चिमूर येथे शहीद स्मृती दिनी शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आले होते. शहरातील मुख्य मार्गावर असणाऱ्या हुतात्मा स्मारकाला त्यांनी भेट दिली. येथे त्यांनी शहिदांच्या स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर त्यांनी किल्ला परिसरातील शहिदांच्या स्मृती भवनाला भेट दिली. याठिकाणी उभारण्यात आलेल्या नागाच्या प्रतिकृतीतील शहीद स्मारकाला व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले.
या दोन्ही ठिकाणी शहिदांना नमन केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी चिमूर येथील बीपीएड कॉलेज येथे आयोजित सभास्थळी भेट दिली. त्यानंतर लगेच मुख्यमंत्र्यांनी काही मिनिटे जनतेशी संवाद साधला. चिमूर क्रांती लढ्यातील शहिदांना मौन बाळगून श्रद्धांजली व्यक्त करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, खासदार अशोक नेते, आमदार देवराव होळी, महापौर अंजलीताई घोटेकर आणि या कार्यक्रमाचे आयोजक कीर्तिकुमार भांगडिया, माजी आमदार मितेश भांगडिया, माजी मंत्री शोभाताई फडणवीस, संजय देवतळे आदी उपस्थित होते. या सोहळ्याला विविध नागरिक उपस्थित होते. मुख्यमंत्री व ना. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी आम्ही शहिदांना अभिवादन करण्यासाठी येथे आलो आहे. माजी पंपप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना दिर्घायुष्य लाभो यासाठी आपल्या प्रार्थना घेऊन दिल्ली जात आहे. त्यांच्या दीर्घयुष्याच्या प्रार्थना करण्याचे भावनिक आवाहन या नेत्यांनी केले.

Web Title: Chief Minister greeted the martyrs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.