बाल युवा साहित्य कला चित्रपट महोत्सवाचा समारोप
By admin | Published: January 18, 2017 12:46 AM2017-01-18T00:46:29+5:302017-01-18T00:46:29+5:30
लोकशिक्षण संस्था द्वारे संचालित लोकमान्य कला अकादमीच्या वतीने तीन दिवसीय बाल युवा साहित्यकला चित्रपट महोत्सवाचे आयोजन लोकशिक्षण संस्थेच्या प्रांगणात करण्यात आले होते.
वरोरा: लोकशिक्षण संस्था द्वारे संचालित लोकमान्य कला अकादमीच्या वतीने तीन दिवसीय बाल युवा साहित्यकला चित्रपट महोत्सवाचे आयोजन लोकशिक्षण संस्थेच्या प्रांगणात करण्यात आले होते.
महोत्सवाचे उद्घाटन ‘हरिश्चंद्राची फॅक्ट्ररी’ फेम पुण्याचे अथर्व कुर्वे व इंडियाज बेस्ट ड्रामेबाज चिन्मय देशकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्हायोलियन वादक अर्थव भालेराव नृत्यांगना स्वरश्री उपद्रेव रॉक बँड वादक शार्दुल पडगीलवार, लोक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. श्रीकांत पाटील, सचिव श्रीकृष्ण घड्याळ पाटील, डॉ. मिलिंद देशपांडे, श्रवंती देशपांडे आदी उपस्थित होते.
‘गणपती बाप्पा मोरया’ या मालिकेत कार्तीकची भूमिका करणारा अथर्व कुर्वे याने विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पा करताना आपला अनुभव कथन केला.
चिन्मय देशकर याने वीर सावकरांच्या जीवनातील एक प्रसंग सादर केला. इंडियाज बेस्ट ड्रामेबाज चिन्मय देशकर याने पश्चिमात्य नृत्य सादर केले. चांदा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राकाँ बँड सादर केला. व्हायोलिन वादक अथर्व भालेराव याने कला सादर केली. त्याला तबल्यावर मडावी या बाल कलावंताने साथ दिली.
नृत्यांगन स्वश्री उपदेव हिने ‘कट्यार काळजात घुसली’, या सिनेमातील गितावर कथ्यक नृत्य सादर केले. अक्षता नक्षीने व सागर शेंद्रे यांनी कॅनव्हास चित्रे काढली. संचालन प्रा. डॉ. जयश्री शास्त्री व प्रा. डॉ. प्रशांत खुळे यांनी केले. त्यानंतर चित्रपट दिग्दर्शन, पटकथा व ध्वनी तंत्र या विषयावर आयोजित परिसंवादात श्याम पेटकर, चित्रपट दिग्दर्शक प्रसाद नामजोशी, ध्वनी तंत्रज्ञ मंदार कमलापुरकर यांनी मार्गदर्शन केले.
संचालन राघवेंद्र अडोणी यांनी केले. नागपूर येथील बाल साहित्यिक श्रवंती देशपांडे हिच्या प्रमुख उपस्थितीत कथाकथन व काव्य संमेलनात बाल कवयित्री सोनाली कुपरे, राष्ट्रीय बाल पुरस्कार प्राप्त मैत्रेयी घनोटे, तीरवंजा येथील श्रुती ताजने, आर्या पिंगे सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)