बालपणीच्या मित्रानेच संपविले मित्राला, कारण गुलदस्त्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:28 AM2021-09-11T04:28:33+5:302021-09-11T04:28:33+5:30
अक्षय व सूरज हे बालपणापासूनचे मित्र होते. गुरुवारी सूरजचा फोन येताच अक्षय लगेच घराबाहेर पडला. मात्र काहीच वेळात शेजाऱ्याला ...
अक्षय व सूरज हे बालपणापासूनचे मित्र होते. गुरुवारी सूरजचा फोन येताच अक्षय लगेच घराबाहेर पडला. मात्र काहीच वेळात शेजाऱ्याला अक्षय चौकात जखमी अवस्थेत पडून असल्याचे दिसले. ही माहिती मिळताच अक्षयचे वडिल लगेच धावून गेले. अक्षय चौकात तळफडत होता. त्याचे कपडे फाटलेले होते. ही अवस्था कोणी केली याची माहिती वडिलांनी घेतली असता सूरजने त्याला लाथाबुक्क्याने मारहाण केली आणि पळून गेला, असे सांगण्यात आले. अक्षयला लगेच रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती मृत घोषित केले. अक्षयचे वडील संतोष कातकर यांच्या फिर्यादीवरुन दुर्गापूर पोलिसांनी कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करुन संजय ऊर्फ सूरज यादव याला अटक केली. शुक्रवारी आरोपीला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सोनोने यांच्यासह दुर्गापूर पोलिसांनी केली.