खेळण्याच्या नादात मुले चढली टॉवरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:20 AM2021-07-16T04:20:41+5:302021-07-16T04:20:41+5:30

सिंदेवाही : शहरातील नगरपंचायत अंतर्गत येत असलेल्या विविध मोबाइल कंपनीचे टॉवर उभे आहेत. शाळा बंद असल्याने लहान मुले या ...

The children climbed the tower to play | खेळण्याच्या नादात मुले चढली टॉवरवर

खेळण्याच्या नादात मुले चढली टॉवरवर

Next

सिंदेवाही : शहरातील नगरपंचायत अंतर्गत येत असलेल्या विविध मोबाइल कंपनीचे टॉवर उभे आहेत. शाळा बंद असल्याने लहान मुले या टॉवरजवळ खेळत असतात. गुरुवारी अचानक लहान मुले उंच टॉवरवर चढले. त्यानंतर ते खालीही उतरले; मात्र हा खेळ अतिशय धोकादायक असून, पालकांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

शहरात नगरपंचायत अंतर्गत विविध मोबाइल कंपनीचे मोठे उंच लोखंडी खांब उभे आहेत. काही टॉवर बंद असल्याने खेळण्याकरिता मुले टाॅवरजवळ जातात. शाळा बंद असल्याने खेळण्याचा मोह आवरत नसल्याने आनंद घेण्याकरिता गुरुवारी मुले चक्क उंच टॉवर चढले. सुदैवाने ते सुरक्षित उतरले; मात्र हा प्रकार धोकादायक आहे. पालकांनी खेळताना मुलांकडे दुर्लक्ष करू नये. मोबाइल टाॅवरचा वापर खेळण्याकरिता नाही, असे मुलांना समजावून सांगणे आवश्यक झाले आहे.

150721\img-20210709-wa0075.jpg

सिंदेवाहीत मुलांची टॉवरवर विरू गिरी अपघातास आमंत्रण: मुलांकडे खेळतांना दुर्लक्ष

Web Title: The children climbed the tower to play

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.