ग्रामीण भागांतील मुलांचा इंग्रजी शाळेकडे कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 10:07 PM2018-05-25T22:07:45+5:302018-05-25T22:08:11+5:30
आपल्या पाल्याला इंग्रजी शाळेत शिक्षण मिळावे, यासाठी पालक आग्रही आहेत. पूर्वी केवळ शहरी भागामध्ये आढळणाऱ्या इंग्रजी शाळा आता ग्रामीण भागातही दिसून येत आहेत. इंग्रजी माध्यमातून कॉन्व्हेंटमध्ये अद्यावत ज्ञान मिळते, असा समज पालकांचा असल्याने खासगी कॉन्व्हेंटकडे पालकांचा कल दिसून येत असल्याने पालकवर्ग हजारो रुपये खर्च करुन आपल्या मुलाला इंग्रजी शिक्षण देत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरपना : आपल्या पाल्याला इंग्रजी शाळेत शिक्षण मिळावे, यासाठी पालक आग्रही आहेत. पूर्वी केवळ शहरी भागामध्ये आढळणाऱ्या इंग्रजी शाळा आता ग्रामीण भागातही दिसून येत आहेत. इंग्रजी माध्यमातून कॉन्व्हेंटमध्ये अद्यावत ज्ञान मिळते, असा समज पालकांचा असल्याने खासगी कॉन्व्हेंटकडे पालकांचा कल दिसून येत असल्याने पालकवर्ग हजारो रुपये खर्च करुन आपल्या मुलाला इंग्रजी शिक्षण देत आहे.
शहरी भागात मागील काही वर्षांपासून गलोगली खासगी इंग्रजी शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. दिवसेंदिवस हे लोन ग्रामीण भागातही पोहचले असून विविध सोईसुविधाचे मोठमोठे बॅनर व जाहिरातीद्वारे पालकांना आकर्षीत करण्यात येत आहे. त्यामुळे पालकवर्गही हजारो रुपये शुल्क देऊन खासगी कॉन्व्हेंटमध्ये आपल्या पाल्यांचा प्रवेश घेत आहेत. मात्र प्रत्यक्षात बहुतेक शाळेमध्ये सुविधा नसतानाही शुल्क आकरण्यात येत आहे.
अपात्र शिक्षकांचा भरणा
कोणत्याही शाखेची पदवी संपादन व इंग्रजी येत असलेल्या अकुशल शिक्षकांचा अनेक इंग्रजी शाळांमध्ये भरणा केलेला आहे डीएड, बीएड, न केलेलें शिक्षक कमी पगारामध्ये मिळत असल्याने संस्था चालकाचेही फावत असल्याने अपात्र शिक्षकांची भरती संचालकांनी केली आहे.
विशिष्ट दुकानातून साहित्य खरेदीसाठी सक्ती
इंग्र्रजी माध्यमांच्या शाळा पालकांना विशिष्ट दुकानातून विद्यार्थ्यांना लागणारी पुस्तके, गणवेश दफ्तर आदी साहित्य खरेदी करण्याची अट घालतात. मात्र संबंधित दुकानामध्ये सर्व वस्तू महाग विकल्या जात असल्याचा आरोप पालकवर्गांकडून होताना दिसून येतो.