लहान मुलांची तब्येत बिघडली, ओपीडीमध्ये तिप्पट वाढ...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 05:00 AM2021-08-21T05:00:00+5:302021-08-21T05:00:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त होत असतानाच लहान मुलांच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या ...

Children's health deteriorated, tripled in OPD ...! | लहान मुलांची तब्येत बिघडली, ओपीडीमध्ये तिप्पट वाढ...!

लहान मुलांची तब्येत बिघडली, ओपीडीमध्ये तिप्पट वाढ...!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त होत असतानाच लहान मुलांच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयातील ओपीडीसह खासगी रुग्णालयांच्या ओपीडीमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण दिसून येत आहेत. यामध्ये जीवघेण्या तापाचेसुद्ध रुग्ण असल्याने काळजी घेण्याचे आवाहन बालरोग तज्ज्ञांनी केले आहे.
दरवर्षी पावसाळ्यात लहान मुलांना सर्दी, खोकला, ताप ही लक्षणे दिसून येतात. मात्र मागील वर्षी आलेल्या कोरोनाने दहशत पसरली आहे. तिसऱ्या लाटेचा धोका लहान मुलांना होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यातच डेंग्यू, मलेरिया, मेंदूज्वर आदी प्राणघातक तापाचे रुग्ण आढळून येत आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयासह खासगी ओपीडीतसुद्धा रुग्न वाढले असल्याचे दिसून येते.

संशयितांची कोरोना चाचणी

- शासकीय किंवा खासगी रुग्णालयात उपचारासाठी आलेली मुले संशयित आढळून आल्यास त्यांची कोरोना चाचणी करण्यात येते. 
- शक्यतो मोठ्या माणसांपासून लहान मुलांना कोरोना होण्याची शक्यता असते. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन बालरोग तज्ज्ञांनी केले आहे.

डेंग्यू-मलेरियाची चाचणी

शासकीय रुग्णालयात तसेच खासगी रुग्णालयातील ओपीडीमध्ये येत असलेल्या लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला, हगणवण, साधा ताप यासह डेंग्यू मलेरिया या जीवघेण्या आजारांची लक्षणे आढळून येत आहेत. त्यामुळे संशयित लक्षणे असताच डॅाक्टरांकडून डेंग्यू, मलेरियाची चाचणी करावयास सांगितल्या जात आहे. सध्यास्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयासह खासगी रुग्णालयात गर्दी दिसून येत आहे.

बालरोग तज्ज्ञ म्हणतात....

पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप आदी समस्या लहान मुलांना जाणवतच असतात. परंतु, आता डेंग्यू, मेंदूज्वर, मलेरिया अशी जीवघेणी आजाराचे रुग्णसुद्धा मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. कुटुंबियांनी काळजी घेतली तरी प्रशासनाकडूनही या जीवघेण्या तापाचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजन करणे गरजेचे आहे. मेंदूज्वर हा अंत्यंत भयावह आहे. यामध्ये बाळ दगावण्याची किंवा वेळीच उपचार न झाल्यास मतीमंद होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याचे लसीकरण गरजेचे आहे. गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून लहान मुलांना मेंदूज्वरांचे लसीकरण करण्यात येत आहे. परंतु, आपल्या जिल्ह्यात अशी कुठल्याही प्रकारची योजना राबविताना दिसून येत नाही. 
- डॅा. अभिलाषा गावतूरे, बालरोग तज्ज्ञ, चंद्रपूर

 

Web Title: Children's health deteriorated, tripled in OPD ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.