चिमुकल्यांची शाळा भरते वऱ्हांड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 11:21 PM2018-09-24T23:21:47+5:302018-09-24T23:22:00+5:30

गेल्या अनेक वर्षांपासून वादग्रस्त १४ गावात महाराष्ट्र -तेलंगणा राज्याची विकास यंत्रणा काम करीत असली तरी आजही येथील नागरिक उपेक्षितांचे जीवन जगत आहेत. वादग्रस्त १४ गावांपैकी मुकादमगुड्यात प्रस्तुत प्रतिनिधीने भेट दिली असता भयाण वास्तव समोर आले. आजही येथील अंगणवाडी शाळेतील बालकांना वºहांड्यात शिक्षण घ्यावे लागत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आहे.

Children's school fills in the groom's uppercase | चिमुकल्यांची शाळा भरते वऱ्हांड्यात

चिमुकल्यांची शाळा भरते वऱ्हांड्यात

Next
ठळक मुद्देसीमावादाचा तिढा कायम : रस्ते नाही, दूरध्वनी सेवाही नाही

शंकर चव्हाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जिवती : गेल्या अनेक वर्षांपासून वादग्रस्त १४ गावात महाराष्ट्र -तेलंगणा राज्याची विकास यंत्रणा काम करीत असली तरी आजही येथील नागरिक उपेक्षितांचे जीवन जगत आहेत. वादग्रस्त १४ गावांपैकी मुकादमगुड्यात प्रस्तुत प्रतिनिधीने भेट दिली असता भयाण वास्तव समोर आले. आजही येथील अंगणवाडी शाळेतील बालकांना वºहांड्यात शिक्षण घ्यावे लागत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आहे.
मुकादमगुडा येथील लोकसंख्या सहाशेच्या जवळपास असून १२५ घरांच्या वस्तीत ० ते ६ वर्षे वयोगटातील ४९ बालके अंगणवाडी शाळेत दाखल आहेत. १९८७ मध्ये स्थापना झालेल्या अंगणवाडी शाळेची इमारत २००७-०८ मध्ये मानव विकास मिशन योजनेतून मंजूर होऊन बांधकामही सुरू झाले होते. मात्र संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित कारभारामुळे अजूनही इमारतीचे बांधकाम अर्धवट राहिले आहे. त्यामुळे अंगणवाडीतील बालकांना कधी समाजभवनात तर कधी वºहांड्यात शिक्षण घेण्याची पाळी आली आहे. एकीकडे तेलंगणा शासन ती वादग्रस्त १४ गावे आमच्या राज्याची असल्याचा दावा करईत आहे तर दुसरीकडे हीच गावे महाराष्ट्र शासनाचीच असतानाही महाराष्ट्र शासन विकास कामाकडे दुर्लक्ष करीत आहे. या गावात महाराष्ट्र शासनाची बस पोहोचली नाही. जायला धड रस्ता नाही, दूरध्वनी सेवा गावात पोहोचल्या नाहीत.

मानव विकास मिशन अंतर्गत गावात अंगणवाडी इमारतीचे बांधकाम सुरू झाले होते. मात्र ते बांधकाम अजूनही अर्धवटच आहे. त्यामुळे आम्हाला कधी समाजभवनात तर कधी वºहांड्यातच अंगणवाडी शाळा भरवावी लागते.
-यशोधरा सत्यपाल नरवाडे,
अंगणवाडी सेविका मुकादमगुडा

Web Title: Children's school fills in the groom's uppercase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.