मुलांचा वाहन हट्ट पुरविणे ठरू शकते जीवघेणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 11:53 AM2019-05-11T11:53:58+5:302019-05-11T11:56:17+5:30

क्लासला जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी पालकांकडे दुचाकी घेऊन देण्याचा हट्टसुरु केला आहे. पालकही मुलांच्या सोयीसाठी दुचाकी घेऊन देण्याचा हट्ट पुरवित आहे. मात्र हा हट्ट मुलांच्या जीवावर बेतू शकतो.

Children's vehicle demand may be dangerous | मुलांचा वाहन हट्ट पुरविणे ठरू शकते जीवघेणे

मुलांचा वाहन हट्ट पुरविणे ठरू शकते जीवघेणे

Next
ठळक मुद्देपालकांनो सावधान !अल्पवयीन मुलांकडे वाहन देऊन पालकच करीत आहेत नियमांची पायमल्ली

साईनाथ कुचनकार।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सध्या शाळा महाविद्यालयांना सुट्या लागल्या आहे. काहींचे निकाल सुद्धा लागले असून अनेक विद्यार्थ्यांनी ट्यूशन क्लास लावले आहे. त्यामुळे क्लासला जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी पालकांकडे दुचाकी घेऊन देण्याचा हट्टसुरु केला आहे. पालकही मुलांच्या सोयीसाठी दुचाकी घेऊन देण्याचा हट्ट पुरवित आहे. मात्र हा हट्ट मुलांच्या जीवावर बेतू शकतो, वाहन चालविण्याचा परवाना नसताना १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांनी जर वाहन चालविले,तर वाहतूक नियमानुसार मुलांच्या पालकांवर गुन्हा दाखल होणार असून दंडही भरावा लागणार आहे. मात्र काही पालक प्रेमापोटी दुचाकी त्यांच्या हातात देत स्वत:सह दुसऱ्यांचे भविष्य धोक्यात टाकत आहे. त्यामुळे पालकांनो सावधान! आता आपल्यापासुनच सुरुवात करा आणि आपल्या पाल्यांचे भविष्य आजपासूनच सुरक्षित करा, असे आवाहन पोलीस तसेच प्रादेशिक परिवहन विभागाने केले आहे.
स्पर्धेच्या युगामध्ये सर्वांनाच समोर जायचे आहे. दुरवर असणारे ट्यूशन क्लॉस, शाळा, विद्यालयामध्ये जाण्या-येणाºया प्रश्न सध्या पालकांना सतावत आहे. त्यातच आपलाच मुलगा इतरांपेक्षा कसा ‘स्मार्ट’ आहे. हे दाखविण्याचा नादात काही पालक पाल्यांचे नको ते हट्ट पुरवित आहेत. दुचाकी संदर्भात तर पालक मुलांची गरजच आहे, असे सांगून वाहन चालविण्याचा परवाना नसतानाही दुचाकी त्याच्या हातात देत आहेत. ती त्यांच्या हातात देण्यामागे मुलांचा त्रास वाचविणे हा पालकांचा हेतू असला तरी १८ वर्षांपर्यंतच्या मुलांच्या बुद्धीचा, त्यांच्या चंचलपणांना आणि एकाग्रतेचा पालक विचारच करीत नाही. एखाद्यावेळी अपघात झाल्यास खापर मात्र, दुसºयावर फोडून मोकळे होण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे वाहनाची गरज, मुलांचे वय, वाहन चालविण्याचा परवाना आदी सर्व गोंष्टींचा विचार करूनच पालकांनी आपल्या पाल्यांच्या हातात वाहन द्यावे, अन्यथा स्वत:ची चूक कधीही भरून न निघणारी ठरू शकते. १८ वर्षापर्यंतच्या मुलांनाही परवाना मिळतो, मात्र त्यांना ५० सीसी असलेले वाहनच चालविण्याची परवानगी आहे. हा परवाना घेऊन अनेकजन १०० सीसी पेक्षा जास्त असेलेले वाहन चालवून नियमाची पायमल्ली करीत आहेत.
थांबा, पहा आणि मगच रस्ता ओलांडा
रस्त्यावरील फुटपाथचा वापर करा, फुटपाथ नसल्यास रस्त्याच्या उजवीकडूनच चाला, त्यामुळे समोरून येणारे वाहने नीट दिसतात आणि रहदारीचा अंदाज येतो. अधे-मध्ये रस्ता ओलांडू नका, झेब्रा क्रॉसिंगवरूनच रस्ता ओलांडा, रस्ता ओलांडताना प्रथम उजवीकडे, नंतर डावीकडे पाहून वाहन येत नाही ना याची खात्री करून, मगच रस्ता ओलांडा, रस्ता ओलांडताना अचानक वाहन आल्यास गडबडून न जाता जागेवरच थांबा, त्यामुळे येणारे वाहन चालक आपले वाहन कंट्रोल करू शकेल.
एकाग्रतेचा अभाव
वाहन चालविताना एकाग्रता अत्यंत महत्त्वाची असते. लहान मुलांमध्ये एकाग्रतेचा अभाव असतो. त्यांच्यामध्ये चंचलपणा असते. बुद्धी परपिक्व झालेली नसते. त्यामुळे त्यांच्या हातात वाहन दिल्यास अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहन चालवताना थोडे जरी दुर्लक्ष झाले तर अपघात होतो. त्यामुळे मानसिक एकाग्रस्ता असणे गरजेचे आहे.
दुसरीकडे थकवा असेल, बरे वाटत नसेल, मानसिक संतुलन बिघडले असेल, कोणशी भांडण झाल्यामुळे राग आला असेल तर वाहन चालविणे टाळले पाहिजे, वाहन चालविताना पान खाणे, तंबाखू चोळणे, संगीत ऐकणे, मोबाईलचा वापर करणे टाळले पाहिजे, पाठीमागे बसलेली व्यक्ती काय चर्चा करतात ,काय बोलतात याकडे लक्ष केंद्रीय करू नये, वाहनाची गती एकदम एक्सीलेटर दाबून वाढवू नये, अचानक ब्रेक लावू नये.
लहान मुलांची अशी घ्या काळजी
मुले अनुकरणप्रिय असतात. मुलांसोबत वाहतुकीचे नियम पाळून आदर्श निर्माण करा. मुलांना रस्ता सुरक्षितेची जाणीव करून द्या, रस्ता सुरक्षेचा धंडा हा घरातूनच बिंबवा, रस्त्यावर चालताना लहान मुलांसोबत पालकांनी राहावे, पालकांनी मुलांच्या शालेय वाहतुकीसाठी सुरक्षित वाहनाचाच वापर करावा, शालेय बसचा वापर करावा, रिक्षामधून वाहतूक करताना आसनक्षमतेपेक्षा दीडपत मुलांची वाहतूक करण्यावर ठाम रहा, मुलांना रस्त्यावर खेळण्यास मनाई करा.
रस्त्यावरील वाहतुकीचे असे आहे नियम
मोटर वाहन अधिनियम १९८९ च्या अधिनियमाच्या तरतुदीनुसार मोटार वाहन चालविण्यासंबंधी काही नियम आहे. वाहन चालकाने वेग मर्यादेचे उल्लंघन करू नये, भार क्षमतेपेक्षा जादा मालाची वाहतूक करू नये, वाहतूक चिन्हांचे व सिग्नल्सचे उल्लंघन करू नये, वाहन चालवितांना योग्य इशाऱ्यांचा वापर करावा, वाहन धोकादायक स्थितीत उभे करू नये, दुचाकी वाहनावर चालकाने स्वत: खेरीज एकाहून जास्त व्यक्ती घेऊन प्रवास करू नये, गणवेशधारी अधिकाºयाने थांबण्याचा इशारा दिल्यानंतर वाहन थांबवावे, अपघात घडल्यानंतर संबंधित माहिती २४ तासाच्या अत पोलिसांना कळवावी, दारू किंवा अमली पदार्थांच्या नशेत वाहन चालवू नये,
अपघात झाल्यास काय करावे ?
वाहन हलवू नये व वाहतुकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घ्या, अपघातग्रस्त वाहनातील जखमींना त्वरित जवळच्या रुग्णालयात घेऊन जा व शक्य झाल्यास त्यांची नावे, पत्ता मिळवा आणि कुटुंबीय,नातेवाईकांना घडलेल्या प्रसंगाची माहिती द्या, अपघाताची सूचना जवळच्या पोलीस स्टेशनला द्या, वाहन चालक अपघात करून पळून गेला किंवा जात असेल तर त्याचे वाहन क्रमांक लिहून ठेवा, अपघासत्ग्रस्त वाहनांची तोडफोड न नुकसान करू नका.
५० सीसी क्षेमतेचा घ्यावा परवाना
दुचाकी वाहन हातात घेण्यापूर्वी प्रत्येक विद्यार्थ्याने मोटार ड्रायव्हींग लायसन्स काढून घ्यावे, ज्या विद्यार्थ्यांचे १६ वर्षे पूर्ण झालेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना ५० सीसी पेक्षा कमी क्षमतेचा दुचाकी वाहन चालविण्याचा परवाना मिळू शकतो. सदर परवाना असणाºया विद्यार्थ्यांना ५० सीसी पेक्षा जास्त क्षमता असणारी वाहने चालविता येत नाही. १० वीतील विद्यार्थ्याला १६ वर्ष पूर्ण होत नसल्याने त्यांना वाहन चालविण्याचा परवाना मिळत नाही. त्यामुळे वाहन चालवू नये,

Web Title: Children's vehicle demand may be dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.