अवकाळी पावसाचा मिरची बाजाराला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2023 20:55 IST2023-03-25T20:55:31+5:302023-03-25T20:55:56+5:30
Chandrapur News शनिवारी दुपारच्या सुमारास चंद्रपूरसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला. कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर येथी मिरची बाजार भरला असताना पाऊस आल्यामुळे या बाजाराला चांगलाच फटका बसला.

अवकाळी पावसाचा मिरची बाजाराला फटका
चंद्रपूर : शनिवारी दुपारच्या सुमारास चंद्रपूरसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला. कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर येथी मिरची बाजार भरला असताना पाऊस आल्यामुळे या बाजाराला चांगलाच फटका बसला.
विसापूर, नांदगाव पोडे व हडस्ती येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील मिरची चंद्रपूर येथील बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणली होती. परंतु, शनिवारी दुपारच्या सुमारास चंद्रपुरात अवकाळी पाऊस आल्याने या बाजाराला चांगलाच फटका बसला. मिरची विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांना आपला माल वाचविण्यासाठी चांगलीच धावपळ करावी लागली.