चिमूर पालिकेत कर भरण्याची अट रद्द
By admin | Published: June 23, 2017 12:39 AM2017-06-23T00:39:56+5:302017-06-23T00:39:56+5:30
नगर परिषद क्षेत्र हागणदारीमुक्त करण्यासाठी स्वच्छ भारत योजनेअंतर्गत शौचालय नसलेल्यांना बांधकाम करण्याचे आदेश देण्यात येत आहे.
नितीन ठाकरे यांची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : नगर परिषद क्षेत्र हागणदारीमुक्त करण्यासाठी स्वच्छ भारत योजनेअंतर्गत शौचालय नसलेल्यांना बांधकाम करण्याचे आदेश देण्यात येत आहे. देयक अदा करताना कर भरणा करा, अशी सक्ती न.प. प्रशासन करीत असल्याने सर्वसामान्य लाभार्थ्यांना फटका बसत होता. ही गंभीर बाब लाभार्थ्यांनी न.प. बांधकाम सभापती नितीन कटारे याचे लक्षात आणून दिल्यावर मुख्याधिकारी शाह यांच्यासोबत सविस्तर चर्चा करुन कर भरणा अट रद्द करण्यात आली आहे.
चिमूर न.प. हद्दीत बहुसंख्य नागरिकांकडे लाखो रुपयांचा कर थकीत आहे. त्या नागरिकांवर कडक कारवाई होणे आवश्यक असताना मात्र न.प. प्रशासन सामान्य नागरिकांना वेठीस धरुन शौचालय लाभार्थ्यांना कर भरणा करण्याची सक्ती करीत होते. त्याचा फटका नागरिकांना बसत होता. त्याची दखल घेऊन न.प. बांधकाम सभापती नितीन कटारे यांनी कर भरणा करण्याविषयी मुख्याधिकारी शाह यांच्याशी सविस्तर चर्चा करुन कर भरणा अट रद्द केली आहे. यामुळे शौचालय लाभार्थ्यांना देयके मिळण्यासाठी दिलासा कीर्तीकुमार भांगडिया यांच्या मार्गदर्शनातून विविध योजनेतून कोट्यावधी रुपयांचे कामे सुरू आहे. विकासाची कामे प्रगती पथावर असल्याची माहिती न.प. बांधकाम सभापती कटारे यांनी दिली.