२० कोटींतून साकारणार चिमूर व भिसी ठाणे

By admin | Published: October 14, 2016 01:24 AM2016-10-14T01:24:57+5:302016-10-14T01:24:57+5:30

चिमूर पोलीस स्टेशनची प्रशासकीय ईमारत व ३८ कर्मचारी निवस्थानांना आणि तालुक्यातील भिसी

Chimur and Bhikee Thane will come up in 20 crores | २० कोटींतून साकारणार चिमूर व भिसी ठाणे

२० कोटींतून साकारणार चिमूर व भिसी ठाणे

Next

भांगडिया यांच्या प्रयत्नांना यश
चिमूर : चिमूर पोलीस स्टेशनची प्रशासकीय ईमारत व ३८ कर्मचारी निवस्थानांना आणि तालुक्यातील भिसी पोलीस स्टेशनची प्रशासकीय इमारत व १४ कर्मचारी निवासस्थान असे एकूण दोन पोलीस स्टेशन व ५२ निवासस्थानांच्या कामासाठी २० कोटी ५४ लाख रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर झाले आहे. चिमूरचे आमदार कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांच्या प्रयत्नाला यश आले असून महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण महामंडळाने सदरील कामाचे ई टेडर काढले आहे. या इमारती येत्या दीड वर्षात पूर्ण होणार आहेत.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून चिमूर येथे पोलीस स्टेशन असून ते शहरात मध्यभागी असले तरी वाहतुकीच्या दृष्टीने अरुंद रस्ते व मोळीच्या ठिकाणी अडचणीचे असल्याने २० वर्षांपूर्वी स्वतंत्र जागा वडाळा पैकू पिंपलनेरी-उमरेड मार्गावर खरेदी करण्यात आली होती. या नवीन ठिकाणी नवीन पोलीस स्टेशन व कर्मचाऱ्यांनी निवासस्थाने व्हावी, अशी पोलीस विभागाची अपेक्षा होती. चिमूर येथील पोलिसांची निवासस्थाने मोलकाळीस आली आहे. तसेच पोलीस स्टेशनही दुरावस्थेत पोहोचले असून अपुरे पडत आहे. तरीही ही समस्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती.
आ. भांगडिया यांनी निवडून आल्यापासून चिमूर व भिसी येथील पोलीस स्टेशन इमारत व निवासस्थानच्या प्रश्नासंदर्भात राज्य शासनाकडे व मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला.
चिमूर तालुक्यातील चिमूर पोलीस स्टेशनची इमारत व ३८ कर्मचारी निवस्थाने आणि भिसी पोलीस स्टेशनची इमारत व १४ कर्मचारी निवासस्थाने असे एकूण दोन पोलीस स्टेशन व ५२ निवासस्थाने यासाठी २० कोटी ५४ लाख रुपयांच्या कामांचे महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण महामंडळाने ई टेडर काढले आहे. त्यामुळे चिमूर व भिसी येथील नवीन इमारतीत पोलीस स्टेशन आणि कर्मचाऱ्यांना नवीन निवास्थाने मिळणार आहेत. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Chimur and Bhikee Thane will come up in 20 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.