चिमूरचे बसस्थानक होणार ‘हायटेक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 12:08 AM2017-09-12T00:08:02+5:302017-09-12T00:08:18+5:30
चिमूर विधानसभा क्षेत्राचे आ. कीर्तीकुमार भांगडीया मागील काही महिन्यांपासून चिमूर बसस्थानकाचा कायापालट करण्यासाठी प्रयत्नरत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : चिमूर विधानसभा क्षेत्राचे आ. कीर्तीकुमार भांगडीया मागील काही महिन्यांपासून चिमूर बसस्थानकाचा कायापालट करण्यासाठी प्रयत्नरत होते. नुकतीच हायटेक बसस्थानक बनविण्यासाठी प्रशासकीय कामास मंजुरी मिळाली असून या कामाची चार कोटी ५८ लाख एक हजार ३४५ रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याने आ. भांगडीयाच्या प्रयत्नाला यश आला आहे.
चिमूर क्रांती नगरी म्हणून प्रचलील आहे. याठिकाणी भरणारी घोडा यात्रा सप्रसिद्ध आहे. तसेच प्रसिद्ध ताडोबा अधारी व्याघ्र प्रकल्पाला जाण्यासाठी मार्गसुद्धा आहे. त्यामुळे अनेक पर्यटक येत असतात. त्यामुळे विविध शासकीय इमारतीसह चिमूरचा बस स्थानकसुद्धा सर्वसोईयुक्त असणे गरजेचे असल्याने संबंधित शासकीय अधिकारी समवेत आ. कितीकुमार भांगडीया यांनी बसस्थानकाची पाहणी केली होती. त्यानुसार संबंधित विभागास पाठपुरावा करून अंदाज पत्रकास प्रशासकीय मंजुरी मिळवून देण्यात यश आले. अंदाजपत्रकातील निधी चार कोटी ५८ लाख एक हजार ३४५ रुपयांची मंजुरी मिळाली आहे.
चिमूर बसस्थानकाची पूनर्बाधणी करण्याच्या कामास उपाध्यक्ष व संचालक मंडळाने प्रशासकीय मंजुरी दिली असून त्यात बसस्थानक इमारतीत आठ फलाटांची इमारत बांधणे यासाठी तीन कोटी १९ लाख ७४ हजार ६०५ रुपये, वाहन तळावर डांबरीकरण करणे व पेव्हर बाल्स बसविणे यासाठी ५५ लाख २२ हजार ३३३ रुपये, लँड स्केपिंग करणे तीन लाख दोन हजार ७५९ रुपये, पाणी पुरवठा व सांडपाणी व्यवस्था करणे १६ लाख ४५ हजार ८७५ रुपये, विद्युत काम ३१ लाख ९७ हजार ४६० रुपये व आदी तरतुदीनुसार चार कोटी ५८ लाख एक हजार ३४५ रुपयांच्या कामाची मंजुरी मिळालेली आहे. त्यामुळे सर्व सोयींयुक्त सदर बसस्थानक बनणार असून प्रवाशांना आकर्षण केंद्र बनणार आहे.
चिमूरच्या बसस्थानक पुनर्बाधनीसाठी निधी खेचून आणल्याबद्दल नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तर चिमूरात सुसज्ज व सर्व सोईउपयुक्त असे बसस्थानक बांधण्यात येणार असून शहराचे सुशोभिकरणात भर पडणार आहे. त्यामुळे नागरिकांत आनंद व्यक्त होत आहे.