चिमूर क्रांती लढ्याचा साक्षीदार लोखंडी पुलाचे अस्तित्व धोक्यात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 01:10 AM2018-04-18T01:10:18+5:302018-04-18T01:10:18+5:30

राष्ट्रसंताच्या भजनाने प्रेरीत होऊन क्रांतिकारकांनी इंग्रजांविरुद्ध पेटून उठले. तत्कालिन इंग्रज अधिकाऱ्याचा शहरापासून एक किमी अंतरावर असलेल्या लोखंडी पुलावर खातमा करण्यात आला. त्यामुळे १६ आॅगस्ट १९४२ च्या क्रांती लढ्यातील साक्षीदार म्हणूनच या पुलाची ओळख आहे.

 Chimur Kranti fight witnesses threat of existence of iron car? | चिमूर क्रांती लढ्याचा साक्षीदार लोखंडी पुलाचे अस्तित्व धोक्यात?

चिमूर क्रांती लढ्याचा साक्षीदार लोखंडी पुलाचे अस्तित्व धोक्यात?

googlenewsNext
ठळक मुद्देऐतिहासिक स्मृती : चिमूर-वरोरा चौपदरीकरणात पूल तुटणार

राजकुमार चुनारकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमुर : राष्ट्रसंताच्या भजनाने प्रेरीत होऊन क्रांतिकारकांनी इंग्रजांविरुद्ध पेटून उठले. तत्कालिन इंग्रज अधिकाऱ्याचा शहरापासून एक किमी अंतरावर असलेल्या लोखंडी पुलावर खातमा करण्यात आला. त्यामुळे १६ आॅगस्ट १९४२ च्या क्रांती लढ्यातील साक्षीदार म्हणूनच या पुलाची ओळख आहे. चिमूर ते वरोरा मार्गाचे चौपदरीकरण सुरू असल्याने या ऐतिहासिक लोखंडी पुलाचे अस्तित्व धोक्यात येणार आहे, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे .
महात्मा गांधींनी ग्वालियर टॅन्क येथून ‘चले जाव’ ही घोषणा दिली होती. या घोषणेचे पडसाद देशभरात उमटले. १६ आॅगस्ट १९४२ च्या क्रांती लढ्यात देशात चिमूर व वर्धा जिल्ह्यातील आष्टी येथील घटना तेजस्वी ठरल्या. या क्रांतीची दखल शासनाने घेतली. पाठयपुस्तकात क्रांतीचा इतिहास समाविष्ट करण्यात आला.
चिमूर शहरात १६ आॅगस्टला शहीद स्मृतीदिन म्हणून साजरा केला जातो. देशभरातील नेते उपस्थित राहून शहिदांना मानवंदना देतात. १९४२ च्या क्रांतीची नोंद भारतीय इतिहासात केली आहे. मात्र, या घटनेचा साक्षीदार असलेल्या अनेक वस्तू नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
विद्यार्थी व पर्यटकांना शहरातील ऐतिहासिक वस्तुंची माहिती मिळावी, अभ्यास करता यावा, याकरीता संग्रहालय उभारण्याची गरज आहे. परंतु, प्रशासनाच्या उदासिनतेमुळे हा वारसा नष्ट होत आहे.
चिमूर येथील १९४२ चा लढा देशात प्रसिद्ध असला तरी इंग्रज अधिकाºयाचा खातमा लोखंडी पुलावर क्रांतिकारकांनी केला. त्या स्थळाची म्हणजे लोखंडी पुलाची शासन दरबारी कुठेच नोंद नाही.
संग्रहालय उभारण्याची गरज
इतिहासातील अनेक वस्तु व वास्तुंचे शासनाकडून जतन केले जाते. मात्र, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात चिमूर शहराने दिलेल्या योगदानाची अजूनही ठळकपणे नोंद करण्यात आली नाही. ब्रिटीश अधिकाºयांना पिटाळून लावण्याचा धाडसीपणा तालुक्यातील क्रांतिकारकांनी दाखविला होता. हा सारा इतिहास अजुनही नव्या पिढीसमोर व्यापकरित्या आला नाही. आता तर रस्ते व इमारती बांधण्याच्या हव्यासापोटी हा वारसा नष्ट करण्याच्या हालचाली केल्या जात आहेत. हा इतिहास हजारो वर्षे पे्ररणा देत राहावा, यासाठी सरकारने वस्तुसंग्रहालय उभारावे, अशी मागणी केली जात आहे.

Web Title:  Chimur Kranti fight witnesses threat of existence of iron car?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.