चिमूर दोन वर्षात बघितले तीन मुख्याधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:32 AM2021-08-25T04:32:51+5:302021-08-25T04:32:51+5:30
मागील दोन वर्षांपासून चिमूर नगरपरिषदेमध्ये मुख्याधिकारी पद रिक्त आहे. प्रभारी मुख्याधिकाऱ्यांच्या खांद्यावर चिमूर नगरपरिषदेचा थातूरमातूर कारभार सुरू आहे. या ...
मागील दोन वर्षांपासून चिमूर नगरपरिषदेमध्ये मुख्याधिकारी पद रिक्त आहे. प्रभारी मुख्याधिकाऱ्यांच्या खांद्यावर चिमूर नगरपरिषदेचा थातूरमातूर कारभार सुरू आहे. या दोन वर्षात चिमूर नगरपरिषदने तीन प्रभारी मुख्याधिकारी बघितले आहेत. प्रभारी मुख्याधिकारी आठवड्यातून एक दिवस येत असल्याने चिमूर शहरातील विकासकामांना खीळ बसली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे नियोजन करण्यात नगरपरिषद अपयशी ठरली होती. मुख्याधिकारी नसल्यामुळे नागरिकांना त्यांच्या कामासाठी वारंवार चकरा माराव्या लागत आहेत. नगरपरिषदेच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, याकडे निवेदनातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधले. उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत निवेदन पाठविले आहे. निवेदन देतेवेळी शिवसेना तालुकाप्रमुख श्रीहरी सातपुते, निवासी उपतालुकाप्रमुख सुधाकर निवटे, चिमूर शहरप्रमुख सचिन खाडे, उपशहरप्रमुख सुभाष नानावरे, देवेंद्र गोठे उपस्थित होते.
240821\img-20210823-wa0031.jpg
चिमूर नगर परिषद मध्ये स्थायी मुख्याधिकारी तात्काळ