चिमूर तालुक्यात सर्वाधिक एक हजार ८९७ पाण्याचे स्त्रोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 06:00 AM2020-03-15T06:00:00+5:302020-03-15T06:00:46+5:30

ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत हातपंप व विहिरी असतात. त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे की, नाही याबाबत चाचपणी करणे आवश्यक असते. त्यामुळे दरवर्षी गावातील हातपंप व विहिरीतील पाण्याची तपासणी केली जाते. पाण्यात दोष आढळल्यास त्यातील पाणी पिण्यायोग्य नसल्याचे नोंदविले जाते.

Chimur taluka has the highest water source of one thousand 1949 | चिमूर तालुक्यात सर्वाधिक एक हजार ८९७ पाण्याचे स्त्रोत

चिमूर तालुक्यात सर्वाधिक एक हजार ८९७ पाण्याचे स्त्रोत

Next
ठळक मुद्देबल्लारपूर तालुक्यात केवळ ४२५ स्त्रोत। ३१ मेपर्यंत होणार पाण्याची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : प्रत्येकाच्या आरोग्याच्या दृष्टीने पाणी हे महत्वाचा घटक आहे. त्यामुळे पाण्यात असलेले जैविक व रासायनिक घटक मानवाला घातक ठरू शकते. यासाठी चालु वर्षामध्ये जिल्ह्यातील सर्व स्त्रोतातील पिण्याच्या पाण्याची रासायनिक तपासणी केली जाणार आहे. सर्वाधिक चिमूर तालुक्यातील ९३ ग्रामपंचायतीमधील १ हजार ८९७ हातपंप व विहीरींचा समावेश आहे. तर सर्वाधिक कमी ४२५ स्त्रोत बल्लारपूर तालुक्यात आहेत.
पाण्यात असलेल्या विविध विषाणुंमूळे थेट आरोग्यावार परिणाम होतो. त्यामुळे पाण्याची तपासणी करून योग्य की, अयोग्य याचा अहवाल जिल्हा परिषद प्रशासन सादर करणार आहे.
ग्रामीण भागात पाण्याचे मुख्य स्त्रोत हातपंप व विहीरी असुन आरोग्याच्या दृष्टीने पिण्यायोग्य पाणी असणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा परिषदेने सन २०२०-२१ या वर्षात पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताची रासायनिक तपासणी करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे.
३१ मे २०२० पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील गावागावांतील पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करण्यात येणार आहे.

तालुका निहाय पाण्याचे स्त्रोत
ब्रम्हपूरी -१२९५ ,बल्लारपूर-४२५ ,भद्रावती -४६४ ,चंद्रपूर-८९१, चिमूर-१८९७, गोंडपिपरी-७२३, जिवती-४३९, कोरपना-७०४, मूल-११७१, नागभिड-१६१७, पोंभुर्णा-६८३, राजुरा-७७९, सावली-१४०८, सिंदेवाही-१२५८, वरोरा-१२१४,
ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत हातपंप व विहिरी असतात. त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे की, नाही याबाबत चाचपणी करणे आवश्यक असते. त्यामुळे दरवर्षी गावातील हातपंप व विहिरीतील पाण्याची तपासणी केली जाते. पाण्यात दोष आढळल्यास त्यातील पाणी पिण्यायोग्य नसल्याचे नोंदविले जाते. त्यामुळे त्या स्त्रोताचे पाणी पिण्यास थांबविण्याची सूचना दिली जाते.

जिल्हा परिषदेच्या अधिपत्याखाली असलेल्या पाणी पुरवठा विभागाच्या पुढाकाराने पाण्याच्या स्त्रोताची तपासणी केली जात आहे. यात सर्वाधिक चिमूर तालुक्यात पाणी स्त्रोत आढळून आले आहे.
- हर्षवर्धन गजभिये
तालुका समन्वयक
पं. स. मूल

Web Title: Chimur taluka has the highest water source of one thousand 1949

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.