चिमुरात शिक्षण विभाग प्रभारीच्या भरवशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:32 AM2021-03-01T04:32:04+5:302021-03-01T04:32:04+5:30

पंचायत समिती शिक्षण विभागांतर्गत जिल्हा परिषदेच्या १५९, अनुदानित खासगी व आश्रमशाळा अशा एकूण २२५ शाळा आहेत. या शाळांमध्ये १०९९ ...

Chimurat Education Department in charge | चिमुरात शिक्षण विभाग प्रभारीच्या भरवशावर

चिमुरात शिक्षण विभाग प्रभारीच्या भरवशावर

Next

पंचायत समिती शिक्षण विभागांतर्गत जिल्हा परिषदेच्या १५९, अनुदानित खासगी व आश्रमशाळा अशा एकूण २२५ शाळा आहेत. या शाळांमध्ये १०९९ शिक्षक कार्यरत आहेत. २५ हजार १० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

तालुक्यातील शेवटच्या गावाची शाळा ३० कि.मी. अंतरावर आहे. भौगोलिक अंतर जास्त असल्यामुळे पं.स.अंतर्गत भिसी, शंकरपूर, जांभुळघाट, नेरी, मांसल, चिमूर, खडसंगी असे सात बीट तयार करण्यात आले असून, यात १४ केंद्रांचा समावेश आहे. या बिटाचा कारभार पाहण्यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी यांची सात पदे मंजूर आहेत. सहा पदे रिक्त आहेत. तसेच केंद्रप्रमुख पदे १४ मंजूर असून, सात पदे रिक्त आहेत. या सर्वांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्याची नियुक्ती आहे. मात्र अनेक वर्षांपासून गटशिक्षणाधिकाऱ्याचा पदभार विस्तार अधिकाऱ्याकडेच आहे.

शिक्षण विभागातील रिक्त पदामुळे अतिरिक्त काम करावी लागत आहेत. शिक्षण विभागातील शैक्षणिक कामासह शालेय पोषण आहार, विद्यार्थ्यांना मिळणारा उपस्थिती भत्ता, शिष्यवृत्ती, क्रीडा संमेलन आदी कामे करताना कमी कर्मचाऱ्यांमुळे कसरत होत आहे.

Web Title: Chimurat Education Department in charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.