क्रांती जिल्ह्यासाठी चिमुरात मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 12:07 AM2017-08-12T00:07:35+5:302017-08-12T00:09:07+5:30
स्वातंत्र्याच्या रणसंग्रामामध्ये विशेष भूमिका बजावणाºया चिमुरकरांनी मागील ४७ वर्षांपासून चिमुरला क्रांती जिल्हा घोषित करण्याची मागणी .....
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : स्वातंत्र्याच्या रणसंग्रामामध्ये विशेष भूमिका बजावणाºया चिमुरकरांनी मागील ४७ वर्षांपासून चिमुरला क्रांती जिल्हा घोषित करण्याची मागणी चिमूर क्रांती जिल्हा कृती समिती व नागरिकांकडून करण्यात येत आहे. शासनाने चिमूर क्रांती जिल्हा घोषित करावा, या मागणीसाठी कृती समितीचे अध्यक्ष नरेंद्र बडे व अनेक राजकीय पदाधिकाºयांच्या नेतृत्वात उपविभागीय कार्यालयावर चिमुरकरांचा शुक्रवारी दुपारी २ वाजता मोर्चा धडकला.
स्वातंत्र लढ्यात मुख्य भूमिका बजावणारे चिमूर शहर १६ आॅगस्टपासून तीन दिवस प्रथम स्वतंत्र झाले होते. यासाठी अनेक स्वातंत्र संग्राम सैनिकांनी बलिदान दिले. तर अनेकांना काळ्या पाण्याच्या शिक्षा भोगाव्या लागल्या. ब्रिटीश सरकारच्या शासनात चिमूर जिल्हा (परगणा) अस्तीत्वात असल्याचे अनेक दाखले स्वातंत्र संग्राम सैनिकांकडून देण्यात येतात. त्यामुळे चिमूरला स्वातंत्र भारतातही स्वतंत्र जिल्हा घोषित करावा, ही मागणी चिमुरकराकडून सातत्याने करण्यात येत आहे.
शासनाने चिमूर क्रांती जिल्ह्याची दखल घ्यावी, याकरिता कृती समितीच्या वतीने अनेक वर्षांपासून वेगवेगळी आंदोलने करून शासनाने लक्ष वेधण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून शुक्रवारला दुपारी २ वाजता बालाजी मंदिर परिसरातून कृती समितीचे अध्यक्ष नरेंद्र बंडे, माजी राज्यमंत्री डॉ. रमेशकुमार गजभे, जि.प. सदस्य गजानन बुटके, महासचिव सुनील मंैद, शिवसेना तालुकाप्रमुख धरमसिंह वर्मा, सुनील दाभेकर, माजी सरपंच मनीष नंदेश्वर यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला.
मोर्चादरम्यान चिमूरक्रांती जिल्हा झालाच पाहिजे, असा कसा होत नाही झाल्याशिवाय राहत नाही, अशा घोषणा देत बहुसंख्य नागरिकांच्या उपस्थितीत मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडकला. मोर्चाचे निवेदन स्वीकारण्यासाठी उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक यांनी मोर्चेकºयांना समोरे जात कार्यालयापुढे स्वीकारले. मोर्चा सुरू होण्यापूर्वी बालाजी मंदिर परिसरात अनेक राजकीय, सामाजिक पुढाºयांनी जिल्ह्याच्या मागणीला अनुसरून मार्गदर्शन केले. यावेळी चिमुरातील नागरिक उपस्थित होते.
स्वातंत्र संग्राम सैनिक काळे गुरुजींची जाणवली उणीव
चिमूर क्रांती जिल्ह्याची मागणी प्रथमत: स्वातंत्र संग्राम सैनिक काळे गुरुजीपासून सुरू झाली. ९ आॅगस्ट क्रांती दिनापासून सुरू होणाºया प्रत्येक आंदोलनात काळे गुरुजी हिरहिरीने सहभाग घ्यायचे. मागील वर्षीच्या महामोर्चात वयाचे ९३ वर्षे गाठले तरी ते तरुणाला लाजवेल, अशा रुबाबात मोर्चात सहभागी झाले होते. मात्र मागील काही महिन्याअगोदर स्वातंत्र संग्राम सैनिक काळे गुरुजी जगाचा निरोप घेतल्याने या मोर्चात त्यांची उणीव प्रकर्षाने जाणवत होती.
ग्राहकांना करावी लागली एक किमीची पायपीट
चिमूर क्रांती जिल्हा झाला पाहिजे, यासाठी शुक्रवारला दुपारी मोर्चा काढण्यात आला. शुक्रवारला आठवडी बाजार असल्याने शांतता सुव्यवस्था राहावी, म्हणून पोलीस प्रशासनाने मोर्चा रस्त्याने जात असताना वाहतूक उपजिल्हा रुग्णालयाजवळ रोखल्याने ग्राहक व प्रवाशांना एक किमीची पायपीट करावी लागली.