राज्यस्तरीय अबॅकस व अर्थमॅटिक सिस्टम स्पर्धेमध्ये चिमूरच्या मुलांची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:26 AM2021-05-16T04:26:34+5:302021-05-16T04:26:34+5:30
पळसगाव (पी) : राज्यस्तरीय ऑनलाइन युसिमास अबॅकस स्पर्धेमध्ये चिमूरमधील मुलांनी कॅलक्युलेटरचा उपयोग न करता १० मिनिटांमध्ये २०० प्रश्नांची उत्तरे ...
पळसगाव (पी) : राज्यस्तरीय ऑनलाइन युसिमास अबॅकस स्पर्धेमध्ये चिमूरमधील मुलांनी कॅलक्युलेटरचा उपयोग न करता १० मिनिटांमध्ये २०० प्रश्नांची उत्तरे देऊन ट्राॅफी पटकावली. विदर्भामध्ये आठवी राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केली होती. त्यामध्ये चिमूर येथील मुलांनी रनर अप आणि मेरीट ट्राॅफी अवॉर्ड जिंकले. युनिव्हर्सल कंसेप्ट ऑफ मेंटल अर्थमॅटिक सिस्टम (युसिमास) द्वारे ५ ते १५ वर्षे मुलांची राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केली गेली होती. या स्पर्धेमध्ये चिमूरच्या १३ मुलांनी भाग घेतला होता. यामध्ये ऑनलाइन परीक्षेच्या माध्यमातून ५ ते १५ वर्षांच्या मुलांनी गणित या विषयात आपले कैशल्य दाखविले.
यामध्ये चिमूरमधील विद्यार्थी मंदार लाखे, अनर्व सोनवाणे, सुहानी लांडगे यांनी रनर अपमध्ये आपले स्थान सुनिश्चित केले, तर साई चौधरी याने मेरिट लिस्टमध्ये स्थान पक्के केले, अशी माहिती चिमूर अबॅकस सेंटरचे संचालक लोकेश बंडे यांनी दिली.