चंद्रपूर  जिल्ह्यामध्ये चायनीज मांजामुळे वाढला अपघाताचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 11:52 AM2021-01-05T11:52:40+5:302021-01-05T11:53:10+5:30

Chandrapur News मकरसंक्रात आली की, पतंग उडविण्यासाठी चढाओढ सुरू होते. लहान-मोठे सर्वच पतंग उत्सव साजरा करतात. यामध्ये अनेकजण चायनीज मांजा वापरतात. त्यामुळे पक्ष्यांना नाहक आपला जीव गमवावा लागत आहे.

Chinese thread of kite in Chandrapur district increase the risk of accidents | चंद्रपूर  जिल्ह्यामध्ये चायनीज मांजामुळे वाढला अपघाताचा धोका

चंद्रपूर  जिल्ह्यामध्ये चायनीज मांजामुळे वाढला अपघाताचा धोका

Next
ठळक मुद्दे महापालिका, पोलीस विभाग, स्वयंसेवी संस्था करणार कारवाई

 लोकमत न्यूज नेटवर्क  

चंद्रपूर : मकरसंक्रात आली की, पतंग उडविण्यासाठी चढाओढ सुरू होते. लहान-मोठे सर्वच पतंग उत्सव साजरा करतात. यामध्ये अनेकजण चायनीज मांजा वापरतात. त्यामुळे पक्ष्यांना नाहक आपला जीव गमवावा लागत आहे, तर अनेक वाहनांचे अपघातही होत आहे. दरम्यान, बाजारात लपून-छपून चायनीज मांजा विक्री सुरू आहे.

शासनाने चायनीज मांजावर बंदी घातली आहे. मात्र, जिल्ह्यात सर्वास हा मांजा मिळत आहे. पक्षांसह मानवाच्या जिवावर बेतणारा हा मांजा वापरू नये, यासंदर्भात जनजागृती केली जात आहे. दरम्यान, व्यावसायिकांनी किंवा नागरिकांनी नायलॉन मांजाचा वापर, विक्री करणाऱ्यांची माहिती मनपाला द्यावी त्यांच्यावर कारवाई करण्याचे महानगरपालिकेतर्फे आवाहन करण्यात आले आहे. मागील काही वर्षांमध्ये अनेक पक्ष्यांना जीव गमवावा लागला आहे, तर दुचाकी, तसेच सायकस्वारांचेही अपघात झाले आहेत. त्यामुळे पतंग उडविण्यापूर्वी प्रत्येकांनी एकदा विचार करणे गरजेचे आहे. बंदी असलेला मांजा बाजारात सहज उपलब्ध होत असल्यामुळे कुणालाही यासंदर्भात फारसे गंभीर नाही.

मांजामुळे अनेक पक्ष्यांचा मृत्यू

चंद्रपूर शहर तसेच जिल्ह्यामध्ये या दिवसात मोठ्या प्रमाणात पतंग उडविले जातात. यासाठी बाराजात चायनीज पतंग, मांजा विक्रीसाठी दाखल होताे. यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. मात्र, दरवर्षी पक्ष्यांचा नाहक बळी जातो. अनेक पक्षी मृत झाले तरीही ते आपल्याला कळतसुद्धा नाही.

नायलाॅन मांजा विक्रेत्यांवर होणार कारवाई

चंद्रपूर महापालिकेने संयुक्त पथक तयार केले असून, या माध्यमातून नायलाॅन मांजा विक्रेत्यावर कारवाई केली जाणार आहे. यासंदर्भात महापालिका उपआयुक्तांनी महापालिका अधिकारी, पोलीस प्रशासन, तसेच स्वयंसेवी संस्थेची बैठक घेतली असून, पथकांचेही गठण केले आहे.

तुरुंगवासाचीही तरतूद

नायलॉन मांजाचा वापर करताना आढळल्यास तुरुंगवासाचीही तरतूद आहे. केवळ विक्रीची ठिकाणेच नाही, तर गोदामे, साठवणुकीची ठिकाणे, घरून विक्री करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे.

हा ठरावीक काळापुरता व्यवसाय आहे. व्यावसायिकांनी किंवा नागरिकांनी नायलॉन मांजाचा वापर, विक्री करणाऱ्यांची माहिती मनपास द्यावी, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे मनपातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

मकरसंक्रात आली की, पतंग उडविण्यासाठी चढाओढ सुरू होते. नायलॉन मांजा अधिक मजबूत असल्याने सारे याचीच निवड करतात. हा मांजा लवकर तुटत नसल्याने पतंग कटली की, रस्त्यावर हा मांजा पडतो. यामुळे अनेकांचे बळी गेले आहेत. दरवर्षी अनेक पक्षी मृत्युमुखी पडतात आणि जखमी होतात. त्यामुळे बंदीची मागणी करण्यात आली आहे.

-बंडू धोतरे

अध्यक्ष, इको-प्रो

चंद्रपूर

Web Title: Chinese thread of kite in Chandrapur district increase the risk of accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.