समाज कल्याण विभागाद्वारे योजनांच्या माहितीसाठी चित्ररथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:50 AM2021-03-13T04:50:54+5:302021-03-13T04:50:54+5:30
चंद्रपूर : कोरोना जनजागृती चित्ररथासोबतच समाज कल्याण विभागाच्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या योजनांचा चित्ररथ जिल्ह्यातील विविध गावांमध्ये ...
चंद्रपूर : कोरोना जनजागृती चित्ररथासोबतच समाज कल्याण विभागाच्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या योजनांचा चित्ररथ जिल्ह्यातील विविध गावांमध्ये प्रचार व प्रसिद्धीसाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आला.
समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती अनुसूचित जाती व नवबौद्ध घटातील लोकांपर्यंत पोहचविणे हे या जनजागृती मोहिमेचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गावांमध्ये चित्ररथाद्वारे ही मोहीम राबविण्यात येत आहे.
सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, सोबत सामाजिक न्याय विभागाच्या विशेष अर्थसाहाय्य योजना जसे-कर्मवीर दादासाहेब गायकवाड योजना, रमाई घरकुल योजना तसेच इतर योजनांची माहिती जिल्ह्यातील ग्रामीण भागात देऊन जनमानसात विस्तृत जनजागृती करण्यात येणार आहे.