मोदींच्या नेतृत्वात चौफेर विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 11:03 PM2019-04-08T23:03:38+5:302019-04-08T23:05:10+5:30
पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात या देशाने चौफेर विकास अनुभवला. त्यांच्या विकासाभिमुख कार्यशैलीवर मतदार मोहोर उमटवतील आणि लोकसभा क्षेत्रातुन हंसराज अहीर बहुमताने विजयी करतील, असा विश्वास अभिनेत्री अमिषा पटेल यांनी व्यक्त केला. पोंभुर्णा येथे भाजपा-शिवसेना-रिपाइं (आ) महायुतीचे उमेदवार हंसराज अहीर यांच्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
पोंभूर्णा : पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात या देशाने चौफेर विकास अनुभवला. त्यांच्या विकासाभिमुख कार्यशैलीवर मतदार मोहोर उमटवतील आणि लोकसभा क्षेत्रातुन हंसराज अहीर बहुमताने विजयी करतील, असा विश्वास अभिनेत्री अमिषा पटेल यांनी व्यक्त केला. पोंभुर्णा येथे भाजपा-शिवसेना-रिपाइं (आ) महायुतीचे उमेदवार हंसराज अहीर यांच्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या.
यावेळी मंचावर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपा तालुका अध्यक्ष गजानन गोरंटीवार, पंचायत समितीच्या सभापती अल्का आत्राम, उपसभापती विनोद देशमुख, जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार आदींची उपस्थिती होती. आरोग्य, शिक्षण, रोजगार, महिला सक्षमीकरण आदी क्षेत्रांवर भर देत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यात केलेली विकासाची कामे तसेच महायुतीचे उमेदवार हंसराज अहीर यांच्या विकासाभिमुख कार्यशैलीमुळे ते विजयी होतील, असेही अमिषा पटेल म्हणाल्या. अर्थमंत्री मुनगंटीवार म्हणाले, जिल्ह्यात कॅन्सर हॉस्पीटल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सैनिकी शाळा, वन अकादमी, बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्र, चिचडोह बॅरेज, पळसगाव-आमडी उपसासिंचन माजी मालगुजारी तलावांची दुरुस्ती, घाटकुळ ब्रिज, पोंभुर्णा येथे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी इको पार्क, आदिवासी महिलांची पहिली कुक्कूटपालन सहकारी संस्था, टुथपिक उत्पादन प्रकल्प, मधुमक्षिका पालनाचा कृषी उद्योग, टाटा ट्रस्टच्या सहाय्याने समृध्द, सदन शेतकरी प्रकल्प, असे विकासाचे विविध टप्पे आम्ही या जिल्हयात जनतेला अनुभवायला दिले आहेत. हा विकासच आमचे शक्तीस्थळ असल्याचे ना. मुनगंटीवार यांनी नमूद केले. यावेळी तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शंकरपूर येथे विजय संकल्प सभा
शंकरपूर : चिमूर-गडचिरोली मतदार संघाचे भाजप-सेना- रिपाइं (आ) महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारार्थ अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रचारसभा सोमवारी शंकरपूर येथे सभा झाली. यावेळी ना. मुनगंटीवार म्हणाले, राज्याचा अर्थमंत्री असलो तरी जिल्ह्याचा नागरिक असल्याने जिल्ह्याच्या विकासासाठी भरपूर निधी देणार आहे. सरकारने अनेक योजना सुरू केल्या. युरियाचे भाव स्थिर ठेवले. चंद्रपूर आदर्श कृषी जिल्हा करण्यासाठी शेतकऱ्यांना तंत्रज्ञान देण्याचे प्रयत्न सुरू आहे. काँग्रेसचा जाहीरनामा मेड इन पाकिस्तान असल्याची टिकाही ना. मुनगंटीवार यांनी केली. यावेळी आमदार कीर्तीकुमार भांगडीया, वसंत वारजूकर, भाजप तालुका अध्यक्ष डॉ. दिलीप शिवरकर, दिगंबर गुरपुडे, नगराध्यक्ष हिरे, जि.प. उपाध्यक्ष कृष्णा सहारे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ.दिलीप शिवरकर व संचालन अजहर शेख, विवेक कापसे यांनी केले.