सीएचपी सयंत्र धोकादायक

By admin | Published: June 5, 2017 12:24 AM2017-06-05T00:24:48+5:302017-06-05T00:24:48+5:30

वेकोलि वणी क्षेत्रातील घुग्घुस रेल्वे सायडींग व सीएचपी सयंत्रापासून नागरिकांना धोका निर्माण होत आहे.

CHP Instrument Dangerous | सीएचपी सयंत्र धोकादायक

सीएचपी सयंत्र धोकादायक

Next

प्रदूषण वाढले : नागरिकांचे आरोग्य धोक्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
घुग्घुस : वेकोलि वणी क्षेत्रातील घुग्घुस रेल्वे सायडींग व सीएचपी सयंत्रापासून नागरिकांना धोका निर्माण होत आहे. यातून दररोज मोठया प्रमाणात प्रदूषण होत असलेल्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे. पर्यावरण संतुलन राखण्याच्या दृष्टीने वेकोलि अधिकाऱ्यांकडून कोणताही प्रयत्न केला जात नाही. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.
गावालगत वेकोलि वणी क्षेत्राचे तीन कोल हॉडलींग सयंत्र आहे. या सयंत्रावरून दररोज सुमारे १० हजार टन कोळसा कास करण्यात येतो. कोळसा वाहतूक व सयंत्राद्वारे कोळसा कासपासून मोठया प्रमाणात प्रदूषण होत आहे. रेल्वे सायडींगवर विविध कोळसा खाणीतून दिवसरात्र कोळसा येते व तो रेल्वे वॅगनमध्ये लोड करण्यात येते. त्या दरम्यान कोळशाची परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ उडते. या प्रदुषणामुळे गावातील व कॉलरी कामगार वसाहतीत लोकांना त्रास होत आहे. कोळसा वाहतूक करणाऱ्या वाहनापासून व रस्त्यावरून होणाऱ्या प्रदुषणामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. हे प्रदूषण थांबविण्याकरिता योजना तर नाहीच. परंतु रस्त्यावर पाणी शिंपडण्याचे सौजन्यही वेकोलि अधिकाऱ्यांकडून दाखविले जात नाही. वेकोलि वणी क्षेत्र हे जणू प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अखत्यारित येत नसावे.

Web Title: CHP Instrument Dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.