दिलासाग्राम स्कूलमध्ये ख्रिसमस कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:15 IST2020-12-28T04:15:47+5:302020-12-28T04:15:47+5:30
बल्लारपूर : येथील दिलासाग्राम कॉन्व्हेंट स्कूलमध्ये ख्रिसमसनिमित्त विविध कार्यक्रम पार पडले. प्रभु येशू यांचे जीवनकार्य, त्यांनी जगाला दिलेला शांतता, ...

दिलासाग्राम स्कूलमध्ये ख्रिसमस कार्यक्रम
बल्लारपूर : येथील दिलासाग्राम कॉन्व्हेंट स्कूलमध्ये ख्रिसमसनिमित्त विविध कार्यक्रम पार पडले. प्रभु येशू यांचे जीवनकार्य, त्यांनी जगाला दिलेला शांतता, अहिंसा आणि मानवतेचा संदेश हे नाटिका, नृत्य तसेच समूह गीतांमधून सादर करण्यात आले. यामध्ये शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. येशु यांच्या जीवनातील काही क्षणचित्रे स्कूल परिसरात कलात्मकपणे लावण्यात आले होते. यावेळी मुख्याध्यापिका सिस्टर क्रिस्टीना म्हणाल्या, प्रभू येशू यांनी सांगितलेली जीवन मूल्य जपून मानवी जीवन व संपूर्ण जग सुंदर सुखमय बनविले पाहिजे, असे आवाहन केले. यावेळी प्रवीण विघ्नेश्वर, डेव्हिड रेबोलो, राहुल बोरीकर, गणेश रहीकवार, सिस्टर गीता, सिस्टर मोली, बबीता नागदेवते, हर्षा वावरे, रुबीना बल्की तसेच शिक्षक व शिक्षिका उपस्थित होत्या.