साधेपणाने साजरा करावा लागणार नाताळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:23 AM2020-12-25T04:23:00+5:302020-12-25T04:23:00+5:30
कोरोनाचे संकट : मार्गदर्शक सूचनांचे करावे लागणार पालन चंद्रपूर : दरवर्षी ख्रिश्चन बांधव नाताळचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. ...
कोरोनाचे संकट : मार्गदर्शक सूचनांचे करावे लागणार पालन
चंद्रपूर : दरवर्षी ख्रिश्चन बांधव नाताळचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. मात्र यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे हा सण साजरा करण्यावरही निर्बंध आले आहे. त्यामुळे कोरोनाचे सर्व नियम पाळून यावर्षी नाताळ साजरा करावा लागणार आहे.
यासाठी चर्चमध्ये जास्तीत जास्त ५० नागरिकांनाच उपस्थित प्रार्थना करावी लागणार आहे. चर्चमध्ये निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करायची असून मास्क व सॅनिटॅयझरचा वापर करावा लागणार आहे. चर्चमध्ये येशूंच्या जीवनावरील देखावे, ख्रिसमस ट्री, काही वस्तू ठेवल्या जातात. त्या ठिकाणी सोशल डिस्टन्स तसेच स्वच्छतेचे नियम पाळावा लागणार आहे. चर्चमध्ये प्रभू येशू ख्रिस्त यांचे स्तुगीत गाण्यासाठी १० गायकांचा समावेश करावा लागणार आहे. चर्च बाहेर व परिसरात दुकाने स्टाल लावण्यारही निर्बंध आहे. ६० वर्षावरील तसेच १० वर्षाखालील बालकांना आरोग्याच्या सुरक्षीततेसाठी घराबाहेर जाणे टाळावे तसेच सण घरीच साजरा करावा लागणार आहे. धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणुक काढता येणार नाही. ३१ डिसेंबर रोजी चर्चमध्ये आयोजित करण्यात येणारी प्रार्थना ही मध्यरात्री आयोजित न करता संध्याकाळी ७ वाजता किंवा त्यापूर्वी घेण्याचे नियोजन करावे लागणार आहे. त्यामुळे यावर्षी नाताळ अगदी साध्यापणाना साजरा करावा लागणार आहे.
-----