क्राईस्ट रूग्णालयाने कामगिरीतून आदर्श प्रस्थापित करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 10:43 PM2018-02-05T22:43:34+5:302018-02-05T22:43:56+5:30
मागील १७ वर्षांपासून क्राईस्ट हॉस्पिटलच्या माध्यमातून लाखो रूग्णांची सेवा घडली आहे. रूग्णसेवा हिच खऱ्या अर्थाने ईश्वरसेवा असून या रूग्णालयाद्वारे वैद्यकीय क्षेत्रात एक आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न या रूग्णालयाच्या व्यवस्थापनाकडून व्हावा, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : मागील १७ वर्षांपासून क्राईस्ट हॉस्पिटलच्या माध्यमातून लाखो रूग्णांची सेवा घडली आहे. रूग्णसेवा हिच खऱ्या अर्थाने ईश्वरसेवा असून या रूग्णालयाद्वारे वैद्यकीय क्षेत्रात एक आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न या रूग्णालयाच्या व्यवस्थापनाकडून व्हावा, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
क्राईस्ट हॉस्पिटलच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्य जागृती प्रदर्शनी, मोफत रोगनिदान व उपचार शिबिराचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर अनिल फुलझेले, भाजपा जिल्हा महामंत्री राहुल सराफ, नगरसेवक संदीप आवारी, माजी न.प. सभापती रविंद्र गुरनुले, नगरसेविका शितल गुरनुले, नगरसेविका शिला चव्हाण, नगरसेविका माया उईके, फादर वर्गीस, फादर जोशी, डॉ. राहुल कोथे, प्रमोद शास्त्राकार, संजय खनके, चंद्रप्रकाश गौरकार आदी उपस्थित होते.
अहीर पुढे म्हणाले, योग्य आरोग्य सेवा ही केंद्र सरकारची प्रमुख भूमिका आहे. त्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य केंद्रे सर्व आधुनिक सोयी-सुविधांनी युक्त असावित या भावनेतून प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या या भुमिकेला प्रत्यक्षात आणण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात देशातील १० कोटी कुटुंबीयांना आरोग्य विम्याकरिता प्रत्येक कुटुंबास प्रतिवर्ष पाच लाख रूपयांचे विमा संरक्षण बहाल करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेवून तशी आर्थिक तरतूद केली असल्याचे सांगितले. यावेळी रुग्णालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.