प्राथमिक शिक्षकांच्या समस्यांवर मंथन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 10:39 PM2018-09-19T22:39:17+5:302018-09-19T22:39:37+5:30
जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नासाठी जिल्हा परिषद चंद्रपूरच्या वतीने महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती सोबत समस्या निवारण सभा जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या कक्षात नुकतीच पार पडली. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी दिपेद्र लोखंडे, मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी खारतुडे आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नासाठी जिल्हा परिषद चंद्रपूरच्या वतीने महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती सोबत समस्या निवारण सभा जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या कक्षात नुकतीच पार पडली. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी दिपेद्र लोखंडे, मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी खारतुडे आदी उपस्थित होते.
पोंभुर्णा, जिवती, चिमूर व ब्रह्मपुरी तालुक्यात प्रशासनाच्या दिरंगाईमुळे शिक्षकांचे वेतन विहित वेळत होत नाही. डिमांड वेळेवर पाठविण्यात येत नाही. बिले सादर करण्यास कुचराई करण्यात येते, शिक्षकांचे समायोजन करताना २०१५चा शासन निर्णय दुर्लक्षित केल्यामुळे अनेक शिक्षक अतिरिक्त झाले. तसेच याबाबतच्या सुचना तालुक्यांना दिल्या नसल्याने तालुका निहाय समायोजन पद्धतीत मोठा फरक पडला असल्याचा आरोपही संघटनेने केला केला. दरम्यान जि. प. अध्यक्षांनी जोपर्यंत शिक्षकांची बिले होत नाही. तोपर्यंत लिपिकांना वेतन देऊ नये, असे निर्देश दिले.
विषय शिक्षक व अन्य पदोन्नती विषयात विस्तार व केंद्र प्रमुख यांच्या पदोन्नतीच्या जागा रिक्त नसल्याने त्यांच्या जागी भरती घेता येणार नाही. मुख्याध्यापकबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच विषय शिक्षकांच्या जागा भरण्याबाबत ३० सप्टेंबरपूर्वी कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच अन्यायग्रस्तांबाबत चौकशी करून न्याय देऊ तसेच संचमान्यतेबाबतच्या असलेल्या त्रुटी दूर करु, वरिष्ठ श्रेणीची प्रलंबित फाईल तात्काळ निकाली करण्यात येईल, बदली प्रकरणातील ज्या तक्रार आहेत. त्या काही प्रमाणात निकाली निघाल्या असून उर्वरित प्रकरणावर कारवाई सुरू आहे, असल्याचे सांगितले. तसेच उपस्थित कर्मचाऱ्यांना एका तारीख ठरवून संपूर्ण करावाई करावी, सेवापुस्तक पडताळणीसाठी कॅम्प लावावे, अशा सूचना दिल्या. यावेळी संघटना प्रतिनिधी विजय भोगेकर, नारायण कांबळे, अल्का ठाकरे, दीपक वरहेकर, हरीश ससनकर, रवी सोयाम, निखिल तांबोळी उपस्थित होते.