‘ते’ परिपत्रक रद्द होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 11:43 PM2018-03-13T23:43:26+5:302018-03-13T23:43:26+5:30
राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने ९ फेब्रुवारीला कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नोकरीसंदर्भात परिपत्रकाद्वारे आदेश जारी केले होते. कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करून हे परिपत्रक रद्द करण्यात येणार आहे, असे आश्वासन राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने ९ फेब्रुवारीला कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नोकरीसंदर्भात परिपत्रकाद्वारे आदेश जारी केले होते. कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करून हे परिपत्रक रद्द करण्यात येणार आहे, असे आश्वासन राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
यावेळी पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले, कर्मचारी सहाय्यक संचालक जिल्हा कौशल्य विकास शासनाच्या प्रत्येक विभागात कंत्राटी कर्मचारी आपली कामे जबाबदारीने पार पाडत आहेत. बरेच कर्मचाऱ्यांनी वयाची चाळीशी पूर्ण केली आहेत. राज्याच्या विकासात कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सुद्धा महत्वाची भूमिका आहे. राज्यातील एकही कर्मचारी शासन काढणार नसून, शासन कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बाजुने उभे आहे. ९ फेब्रुवारी २०१८ ला काढलेल्या परिपत्रकामुळे कंत्रांटी कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे हे परिपत्रक लवकरच रद्द करणार असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. यामुळे राज्यातील सर्व कंत्रांटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कंत्राटी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायद्यानुसार वेतन मिळावे. कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे आरोग्याच्या सुविधा आणि नोकरीची हमी द्यावी. वेतनातील अनियमितता दूर करावी. सेवाज्येष्ठता अधिक असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अन्याय करू नये, जिल्ह्यातील विकास कामे पूर्ण करण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असल्याने त्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करावा, असा उल्लेख निवेदनात करण्यात आला होता.