जलकुंभातून नागरिकांना मिळत आहे दूषित पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:19 AM2021-06-21T04:19:37+5:302021-06-21T04:19:37+5:30
सडलेले मांस, आतडे, हड्डी?????????????????????????? भद्रावती : तालुक्यातील गट ग्रामपंचायत गुडगाव (वडगाव) येथे नळ योजनेद्वारे गावात घरोघरी पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा ...
सडलेले मांस, आतडे, हड्डी??????????????????????????
भद्रावती : तालुक्यातील गट ग्रामपंचायत गुडगाव (वडगाव) येथे नळ योजनेद्वारे गावात घरोघरी पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा केला जातो आणि येथेच चक्क जलकुंभातून येणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमधून पक्षाचे पंख, सडलेले मांस, आतडे, हड्डी आढळून आले असून त्यातून दूषित पाणीपुरवठा केला जात आहे. हा जलकुंभ आणि पाइपलाईन स्वच्छ करून पाणी पिण्यायोग्य करावे अन्यथा नागरिकांच्या आरोग्याशी खेळल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गुडगाववासीयांनी प्रशासनाला दिला आहे.
गुडगाव (वडेगाव) हे १५० घराची वस्ती असलेले गाव आहे. आरोग्य विषयी तेथे सुविधा नाही. त्यासाठी २८ किमी अंतर गाठून त्यांना भद्रावती शहर किंवा जवळपास चोरा ग्रामीण भागात जावे लागते. या गट ग्रामपंचायतीच्या ठिकाणी शासनाने राबविलेल्या नळ योजना मोहिमेतून गावात पिण्याच्या पाण्याची योजना राबविलेली आहे आणि या जलकुंभातून तेथील नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो आणि त्यामध्ये मागील चार ते पाच दिवसांपासून येणाऱ्या नळाच्या पाण्यातून पक्षाचे पंख, सडलेले मांस, आतडे, हड्डी आढळल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. सध्या कोरोनाच्या संक्रमणामुळे प्रशासनाने ग्रामीण भागांना सतर्क राहण्याचा इशारा केला आहे. येथील जीवजंतूचे दूषित पाणी पिल्यास आरोग्य खराब होऊन होणारी जीवितहानी नाकारता येत नाही. ग्रामवासीयांनी सरपंच आणि ग्रामसेवक यांना याबाबत वारंवार सूचना दिल्या; मात्र डोळेझाक करून दुर्लक्ष केले जात आहे. गुळगाव ग्रामपंचायतीने गावातील जलकुंभ व पाणी पुरविणारी पाईपलाइन साफ करावी, तसेच गावकऱ्यांच्या आरोग्याशी खेळू नये,अशी मागणी नागरिकांनी केली आहे.