नागरिकांनो सावधान, ७० कोरोना रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:32 AM2021-03-01T04:32:17+5:302021-03-01T04:32:17+5:30

मागील २४ तासात १६ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर ७० कोरोनाबाधित रुग्णांची ...

Citizens beware, 70 corona patients added | नागरिकांनो सावधान, ७० कोरोना रुग्णांची भर

नागरिकांनो सावधान, ७० कोरोना रुग्णांची भर

googlenewsNext

मागील २४ तासात १६ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर ७० कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २३ हजार ६७४ वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २२ हजार ९५३ झाली आहे. सध्या ३२३ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत २ लाख १४ हजार ७५२ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख ८९ हजार ११६ नमुने निगेटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत ३९८ बाधितांचा मृत्यू झाला आहे. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३६०, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १८, यवतमाळ १६, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

बाॅक्स

रविवारचे बाधित रुग्ण

चंद्रपूर महापालिका क्षेत्र 15

चंद्रपूर तालुका ०३

बल्लारपूर ०३

भद्रावती ०४

ब्रम्हपुरी ०१

मुल ०५

राजुरा ०१

चिमूर ०१

वरोरा ३७

--

वयोमानानुसार आजपर्यंत झालेले मृत्यू

वय पुरुष महिला एकूण

३० ते ४० १८ ०५ २३

४० ते५० ४१ ०९ ५०

५० ते ६० ८२ २३ १०५

६०ते समोर १६४ ५६ २२०

एकूण ३०५ ९३ ३९८

बाक्स

३०५ पुरुष तर ९३ महिलांचा आजपर्यंत मृत्यू

कोरोना रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. जिल्हयात आजपर्यंत ३९८ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ३०५ पुरुष तर ९३ महिलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, ६० वर्षावरील १६४ पुरुषांचा तर ५६ महिलांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

कोट

कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यात आढळत आहे. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे. मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसुत्रीचा नियमित वापर करावा.

-अजय गुल्हाने

जिल्हाधिकारी, चंद्रपूर

Web Title: Citizens beware, 70 corona patients added

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.