पुतळा अवहेलनाप्रकरणी नागरिकांचा उपोषणाचा इशारा

By admin | Published: January 14, 2016 01:27 AM2016-01-14T01:27:02+5:302016-01-14T01:36:41+5:30

दिवंगत माजी मुख्यमंत्री मा. सा. कन्नमवार यांच्या पुतळ्याच्या अवहेलना प्रकरणाचे पडसाद आता उमटायला लागले आहेत.

Citizens' hunger strike for defamation of statue | पुतळा अवहेलनाप्रकरणी नागरिकांचा उपोषणाचा इशारा

पुतळा अवहेलनाप्रकरणी नागरिकांचा उपोषणाचा इशारा

Next

तीव्र पडसाद : प्रकरण कन्नमवारांच्या पुतळा स्वच्छतेचे
चंद्रपूर : दिवंगत माजी मुख्यमंत्री मा. सा. कन्नमवार यांच्या पुतळ्याच्या अवहेलना प्रकरणाचे पडसाद आता उमटायला लागले आहेत. जिल्हा बेलदार समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रकाराबाबत तीव्र रोष व्यक्त केला असून महापौर आणि महानगर पालिकेच्या कारभाराविरोधात उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
चंद्रपूर जिल्हा बेलदार समाज संघटनेच्या सुमारे २५ पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ समाजातील ज्येष्ठ नागरिकांसह सायंकाळी महापौरांना भेटण्यासाठी महानगर पालिकेत गेले होते. मात्र पालकमंत्र्यांच्या बैठकीसाठी जायचे असल्याचे सांगून महापौर राखी कंचर्लावार यांनी भेट टाळल्याचा अनुभव या शिष्टमंडळाला आला. या प्रकाराबद्दल नागरिकांनी तीव्र रोष व्यक्त केला आहे. महापौरांना पुतळा स्वच्छ करण्यासाठी आणि नागरिकांना भेटण्यासाठीही वेळ नसेल तर, आंदोलनाच्या मार्गाने प्रश्न सोडवावा लागेल, अशी भूमिका यावेळी घेण्यात आली.
दरम्यान, कन्नमवारांच्या पुतळ्याची अवहेलना आणि स्वच्छतेच्या मुद्यावरून येत्या पंधरा दिवसात महानगर पालिकेने दखल घेतली नाही तर पुतळयासमोरच बेमुदत उपोषण करण्याचा इशारा जिल्हा बेलदार समाज संघटनेचे अध्यक्ष विजय बोरगमवार आणि उपाध्यक्ष अशोक इंगुलकर यांनी दिला आहे. या प्रकाराबद्दल गुरूवारी पालकमंत्र्यांना भेटून त्यांच्यापुढे हा प्रकारही कथन केला जाणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

पुतळा परिसरात होर्डिंगला परवानगी नाकारा
जटपुरा गेटजवळील मा. सा. कन्नमवार यांच्या पुतळ्यासमोर उभारल्या जाणाऱ्या होर्डिंगला महानगर पालिका कशी काय परवानगी देते, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. न्यायालयाने होर्डिंग अवैध ठरविले असतानाही महापौर राखी कंचर्लावार यांच्या परवानगीने हे होर्डींग पुतळ्यासमोर लागलेले चालतात. मात्र पुतळयासभोवताल असलेली घाण स्वच्छ करणे त्यांना का जमत नाही, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. या होर्र्डिंगमुळे पुतळा दिसत नाही. फुटपाथ व्यावसायीकही अतिक्रमण करतात. पुतळ्यासमोरच एक चारचाकी वाहन नेहमी पार्किंग केलेले असते. त्यावरही कारवाई होत नाही. महानगर पालिका आणि प्रशासन या प्रकाराची दखल घेणार नसेल तर आंदोलन उभारण्याचा इशारा निवेदनातून विजय बोरगमवार, अवधुत कोटेवार, अशोक इंगुलवार, अनिल बोरगमवार, वसंत आकुलवार, शंकर डांगेवार, सचिन पेशट्टीवार, सुरेश पुल्लावार आदींनी दिला आहे.

Web Title: Citizens' hunger strike for defamation of statue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.