सोनेगाव बेगडेतील दूषित पाण्याने नागरिकांना आजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 11:58 PM2019-05-12T23:58:48+5:302019-05-13T00:00:21+5:30
चिमूर नगर पालिकेअंतर्गत येणाऱ्या सोनेगाव बेगडे येथे पिण्याच्या पाण्याच्या नळाला गढूळ पाणी येत असून ते पाणी पिल्याने गावातील अनेकांना विविध आजाराची लागण झाली आहे. हगवण, उलट्याचा त्रास वाढल्याने गावातील काहींना चिमूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर: चिमूर नगर पालिकेअंतर्गत येणाऱ्या सोनेगाव बेगडे येथे पिण्याच्या पाण्याच्या नळाला गढूळ पाणी येत असून ते पाणी पिल्याने गावातील अनेकांना विविध आजाराची लागण झाली आहे. हगवण, उलट्याचा त्रास वाढल्याने गावातील काहींना चिमूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले असून शुद्ध पाणी पुरवठा करण्याची मागणी नागगरिकांनी केली आहे.
यावर्षी चिमूर येथे पाण्याची पाण्याची बिकट समस्या निर्माण झाली आहे. पालिकेच्या हद्दीत येणाºया सोनेगाव बेगडे येथील पिण्याच्या पाण्याचे नळाला काही दिवसांपासून गढूळ पाणी येत होते. तर काही नळांना मातीचा गाळही येत होता. अशा परिस्थितीत नागरिकांनी ते पाणी पिल्याने नागरिकांना हगवण, उलट्यांचा त्रास होऊ लागला. हा त्रास वाढल्याने येथील शोभा जयगोपाल पिंपळकर, गजानन शत्रुघ्न नन्नावरे, डोमा गजीक, अर्जून कमलाकर नन्नावरे, सपना सचिन नन्नावरे, नामदेव चौधरी, गिरीधर नन्नावरे, रोहन चिंधुजी ढोणे, सुमित चिंधूजी ढोणे, माधुरी भास्कर ढोणे यांच्यासह गावातील १५ नागरिकांना चिमूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यातील काहींना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. गावातील विहिरी व नळाच्या पाण्याचे नमुन्यांची तपासणी केली असता, ते पाणी पिण्या योग्य नसल्याचे आढळून आल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे पिण्यासाठी पाणीच मिळत नसल्याने आम्ही कुठले पाणी प्यायचे, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, गावात दवंडी देऊन विहिरीचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे सांगण्यात आले होते. या विहिरीच्या पाण्याचा वापर पिण्यास करू नका, सार्वजनिक नळाच्या पाण्याचा पिण्यासाठी वापर करा, असे सांगण्यात आले होते. परंतु नळालासुद्धा दूषितच पाणी येत असल्याने कुठले पाणी प्यायचे, हा मोठा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित झाला आहे.
नगर परिषद प्रशासन या बाबींची दखल घेत नसल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. गावात आजाराची लागण झाल्याने गावकºयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्या, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
विहिरीच्या उपशाकडे प्रशानाचे दुर्लक्ष
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने सर्वत्र पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. यापूर्वीच जर प्रशासनाने उपाययोजना केली असती तर आज ग्रामस्थांवर ही वेळ आली नसती.