पळसगाव येथील नागरिक पिण्याच्या पाण्याच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:26 AM2021-02-07T04:26:38+5:302021-02-07T04:26:38+5:30
पळसगाव (पि) : चिमूर तालुक्यातील पळसगाव येथील जवळपास सर्व हातपंपाचे पाणी संपत आलेले आहे . दिवसरात्र नागरिक, महिला, वृद्ध ...
पळसगाव (पि) : चिमूर तालुक्यातील पळसगाव येथील जवळपास सर्व हातपंपाचे पाणी संपत आलेले आहे . दिवसरात्र नागरिक, महिला, वृद्ध आणि लहान मुले सापडेल, त्याठिकाणी पाणी भरण्यासाठी भटकंती करताना दिसत आहेत.
वारंवार नळाच्या या यंत्रणेत त्रुटी आढळून येत आहेत. त्याचा फटका प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या व पाण्याचा अपव्यय टाळणाऱ्या नागरिकांना बसत आहे. महिलांना व शालेय विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी सर्वदूर भटकंती करताना दिसत आहेत, दर दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. मात्र आज जवळपास गाळ उपसाच्या कारणाने महिना झाला असून नळाला पाणी आले नाही. पाणी मिळणार की नाही, अशी चर्चा सामान्य जनतेतून सुरू आहे. पिण्यासाठी पाणी तसेच घरगुती इतर वापरासाठी पाणी उपलब्ध होत नाही. परिणामी जो तो आपापल्या परिसरात जाऊन पाण्यासाठी दाही दिशा भटकताना दिसत आहे. त्यामुळे ही समस्या खूप गंभीर झाली आहे. कोरोनाच्या काळात शासन वारंवार हात धुण्यास व आंघोळ करण्यास सांगत आहे. त्यात कोरोनाच्या काळात शासन-प्रशासनाने विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. दर तासाने २० सेकंदांपर्यंत हात धुणे, दिवसातून दोन वेळा आंघोळ करणे, बाहेरून येताच सर्व कपडे धुण्यास टाकणे असे आवाहन केले जात आहे. मात्र, पाणीच नसेल तर या आवाहनाला प्रतिसाद कसा द्यावा, हा प्रश्न नागरिकांपुढे आहे. पाण्याची समस्या दूर करण्यात यावी, अशी मागणी सर्व आहे.