भारनियमनामुळे पिंपळगाव परिसरातील नागरिक त्रस्त
By Admin | Published: November 27, 2014 11:31 PM2014-11-27T23:31:40+5:302014-11-27T23:31:40+5:30
पिंपळगाव परिसरात सकाळी सहा ते सायंकाळी सहा पर्यंत बारा तासाचे भारनियमन केले जात आहे. त्यामुळे धानपिक धोक्यात आले असून लहान मोठे उद्योग धंदे बडघाईस आले आहेत.
पिंपळगाव : पिंपळगाव परिसरात सकाळी सहा ते सायंकाळी सहा पर्यंत बारा तासाचे भारनियमन केले जात आहे. त्यामुळे धानपिक धोक्यात आले असून लहान मोठे उद्योग धंदे बडघाईस आले आहेत.
पिंपळगाव (भो) हा धान पीक व भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध भाग आहे. नुकतीच धान पिकांची कापनी चालू झाली असून सकाळी सहा वाजतापासून महिला धान कापनीसाठी गुत्यात जात आहेत. सायंकाळी ६ वाजता घरी परत आल्यावर सर्वत्र अंधार पसरलेला असते. दिवसभर वीज नसल्यामुळे महिलांची आटाचक्कीवर पीठ दळण्यासाठी गर्दी असते. त्यामुळे महिलांना रांगेत राहून रात्री १० पर्यंत राहावे लागत आहे.
गेल्या कित्येक दिवसांपासून या परिसरात भारनियमन केले जात असल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेकांचा वीज वापर कमी असतानाही भरमसाठ वीज बील पाठविले जात असल्याने सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. अनेक शेतकऱ्यांकडे मोटारपंपाचे बिल थकीत असल्याने भारनियमन केले जात आहे. मात्र याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागत असलचयाने वीज वितरणच्या कारभाराप्रति तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे.
पिंपळगाव परिसरात अनेक छोटे उद्योग आहेत. मात्र, विजेअभावी हे उद्योग डबघाईस आले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांना मजुरी केल्याशिवाय पर्याय नसल्याचे विद्युत वितरण कंपनीवर नागरिक रोष व्यक्त करीत आहे. महावितरण कंपनीने या परिसरातील भारनियमन तत्काळ बंद करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. (वार्ताहर)