मान्सून बरसल्याने नागरिक सुखावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:19 AM2021-06-11T04:19:58+5:302021-06-11T04:19:58+5:30
जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असताना दोन आठवड्यांपूर्वी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर ऊन पडल्याने सलग १५ दिवस नागरिकांना ...
जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असताना दोन आठवड्यांपूर्वी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर ऊन पडल्याने सलग १५ दिवस नागरिकांना उकाडा सहन करावा लागता. त्यामुळे मान्सूनचे आगमन केव्हा होणार याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले होते. शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण करून पावसाची प्रतिक्षा करीत आहेत. राज्यात मेघगर्जना तसेच विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने ४ जून रोजी वर्तविली होती. याशिवाय विदर्भातही मान्सूनचे आगमन होणार असल्याचा अंदाज नागपूर प्रादेशिक विभागाने वर्तविला होता. बुधवारी विदर्भातील चंद्रपूर वगळता बहुतांश जिल्ह्यांत मान्सून दाखल झाला. दरम्यान, आज दुपारी अचानक ढगांनी गर्दी करून मान्सून बरसल्याने नागरिक सुखावले आहेत. येत्या काही दिवसांत पडणाऱ्या मुसळधार पावसाची एक झलक आज जिल्ह्यात पाहायला मिळाली. दमदार पाऊस पडला तर शेतकरी पेरणीच्या कामाला लागणार आहे.