नागरिक बिनधास्त; मास्क, सॅनिटायझरची विक्री घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:33 AM2021-08-14T04:33:04+5:302021-08-14T04:33:04+5:30

नागरिकांमध्ये बिनधास्तपणा वाढल्याने कोरोना प्रतिबंधक उपायांकडे दुर्लक्ष होत असल्याने निदर्शनात येते. दुसऱ्या लाटेत कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने ...

Citizens without hesitation; Sales of masks and sanitizers declined | नागरिक बिनधास्त; मास्क, सॅनिटायझरची विक्री घटली

नागरिक बिनधास्त; मास्क, सॅनिटायझरची विक्री घटली

Next

नागरिकांमध्ये बिनधास्तपणा वाढल्याने कोरोना प्रतिबंधक उपायांकडे दुर्लक्ष होत असल्याने निदर्शनात येते. दुसऱ्या लाटेत कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने चिंतेचे वातावरण पसरले होते. संसर्गापासून बचाव म्हणून मास्कचा वापर व सॅनिटायझने हात वारंवार धुणे, फिजिकल डिस्टन्सचे पालन करणे, रोगप्रतिकार शक्ती वाढवणे आदी उपाय वैद्यकशास्त्रात तज्ज्ञाकडून सांगितले जाते. डबल मास्क वापरा आणि कोरोना टाळा असाही सल्ला डॉक्टरांनी दिला होता. मार्च ते मे या तीन महिन्यात गर्दीच्या तसेच सार्वजनिक ठिकाणी वावरताना वापर वाढल्याने विक्रीतही वाढ झाली होती. जून महिन्यापासून दुसरी लाट ओसरत असल्याने नागरिक बिनधास्त झाले आहे. आता सिंगल मास्क वापरणेही अनेकांनी बंद केले आहे.तालुक्यात जवळपास ६५ टक्के मास्क व सॅनिटायझरची विक्री कमी झाली आहे.

Web Title: Citizens without hesitation; Sales of masks and sanitizers declined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.