शहरातील मजूर गावाकडे परतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:30 AM2021-04-28T04:30:52+5:302021-04-28T04:30:52+5:30

चंद्रपूर : रोजगाराअभावी ग्रामीण भागातील अनेक कामगार, मजूर कामाच्या शोधात शहरात गेले होते. मात्र आता कोरोनाच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी ...

The city laborers returned to the village | शहरातील मजूर गावाकडे परतले

शहरातील मजूर गावाकडे परतले

Next

चंद्रपूर : रोजगाराअभावी ग्रामीण भागातील अनेक कामगार, मजूर कामाच्या शोधात शहरात गेले होते. मात्र आता कोरोनाच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन सुरू केले आहे. त्यामुळे अनेक कामगार पुन्हा आपल्या गावाकडेच परत जात आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात उद्योगांची वानवा आहे. त्यामुळे अनेक बेरोजगार युवक रोजगाराच्या शोधात जिल्ह्याच्या ठिकाणी येतात. येथे छोटे-मोठे काम करून आपली उपजीविका भागवीत असतात.

अनेकजण पेंटिंग किंवा कंत्राटदाराकडे घर बांधकाम करीत असतात. मात्र आता बांधकाम बंद आहे. त्यामुळे येथे उपाशी राहण्यापेक्षा गावाकडे जाऊ, या उद्देशाने परत गावाकडे परत गेले.

अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त

चंद्रपूर : शहरातील सिस्टर कॉलनी परिसरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे नागरिकांना कोरोनाच्या दहशतीत पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याबाबत परिसरातील नागरिकांनी अनेकदा मनपा प्रशासनाकडे निवेदन दिले. मात्र अद्याप कुठलाही पर्याय शोधण्यात आला नाही.

Web Title: The city laborers returned to the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.