पोंभुर्णा शहर राज्यात विकासाचे मॉडेल ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:30 AM2021-02-16T04:30:15+5:302021-02-16T04:30:15+5:30

शनिवारी तालुका क्रीडा संकुल, गाव तलाव, व्यायामशाळा व श्री राजराजेश्वर मंदिर परिसर सौंदर्यीकरण कामाच्या लोकार्पणाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ...

The city of Pombhurna will be a model of development in the state | पोंभुर्णा शहर राज्यात विकासाचे मॉडेल ठरणार

पोंभुर्णा शहर राज्यात विकासाचे मॉडेल ठरणार

Next

शनिवारी तालुका क्रीडा संकुल, गाव तलाव, व्यायामशाळा व श्री राजराजेश्वर मंदिर परिसर सौंदर्यीकरण कामाच्या लोकार्पणाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले तर प्रमुख पाहुणे जि. प. सदस्य राहुल संतोषवार, प. सं. सभापती अलका आत्राम, उपसभापती ज्योती बुरांडे, माजी नगराध्यक्ष गजानन गोरंटीवार, श्वेता वनकर, माजी उपाध्यक्ष रजिया कुरैशी, अरुण कोतपल्लीवार, अजित मंगळगिरीवार, नंदकिशोर तुम्मुलवार, ईश्वर नैताम, महेश रणदिवे, ऋषी कोटरंगे, वैशाली बोलमवार, विनोद कानमपल्लीवार, नरेंद्र बघेल आदी उपस्थित होते. आ. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, पोंभुर्णा शहरात विकासाची दीर्घ मालिका तयार केली आहे. ग्रामीण रूग्णालय, न. पं. इमारत बांधकाम, टुथपिक उत्पादन केंद्र, अगरबत्ती उत्पादन केंद्र बांबू हॅन्डीक्रॉफ्ट अ‍ॅण्ड आर्ट युनिट, इको पार्क व विविध सभागृहांचे बांधकाम पूर्ण केले. ७ कोटींची पाणी पुरवठा योजना व अन्य कामेही प्रगतिपथावर आहेत. आदिवासी महिलांची राज्यातील पहिली महिला कुक्कुटपालन संस्था, मधमाशीपालन प्रकल्प, बंधारे बांधकाम असे विविध प्रकल्प या भागात पूर्णत्वास आणल्याचेही आ. मुनगंटीवार यांनी सांगितले. कार्यकारी अभियंता भास्करवार यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

Web Title: The city of Pombhurna will be a model of development in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.