जनआक्रोश आंदोलनाची जय्यत तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 11:56 PM2017-11-04T23:56:45+5:302017-11-04T23:56:58+5:30

प्रदेश कॉग्रेसतर्फे राज्य सरकारच्या विरोधात ६ नोव्हेंबरला चंद्रपुरात विभागीय जनआक्रोश आंदोलनाचे आयोजन चांदा क्लब गाऊंडवर केले आहे.

The City of Shock Movement | जनआक्रोश आंदोलनाची जय्यत तयारी

जनआक्रोश आंदोलनाची जय्यत तयारी

Next
ठळक मुद्देदोन वेगवेगळ्या ठिकाणी कार्यकर्ते कामाला : पोलिसांचीही बंदोबस्ताची तयारी पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : प्रदेश कॉग्रेसतर्फे राज्य सरकारच्या विरोधात ६ नोव्हेंबरला चंद्रपुरात विभागीय जनआक्रोश आंदोलनाचे आयोजन चांदा क्लब गाऊंडवर केले आहे. या मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी काँग्रेसचे उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार हे चंद्रपुरात तळ ठोकून आहेत. तर दुसरीकडे विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्यावतीने इंदिरा गांधी गार्डन स्कूलवरही तयारीला गती आली आहे. या दोन्ही कार्यक्रमांसाठी आयोजकांकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनीही बंदोबस्ताची तयारी पूर्ण केली आहे.
चांदा क्लब गाऊंडवर मोठा पेंडाल टाकण्यात येत आहे. दरम्यान, सदर आंदोलनाबाबत गुरुवारी आ. विजय वडेट्टीवार यांनी इंदिरा नगर प्रभागात सभा घेतली. आंदोलनाबाबत आढावा घेतला.
६ नोव्हेंबरला चंद्रपुरात भाजपा सरकारच्या विरोधात काँग्रेसजण जनआक्रोश व्यक्त करणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. अशोक चव्हाण राहणार आहेत. तसेच सदर मेळाव्याला विदर्भातून असंख्य नागरिक उपस्थित राहणार असल्याने चांदा क्लब गाऊंडवर ५० हजार नागरिक येणार असल्याचा अंदाज बांधला जात आहे. अशी व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच महिला व पुरुषांच्या बसण्याची स्वतंत्र्य व्यवस्था करण्यात आली आहे. याचबरोबर व्यासपिठासाठी साडेपाच फूट उंचीचा मंच तयार करण्यात आला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध प्रभागात सभा घेण्यात येत आहे. गुरुवारी आ. विजय वडेट्टीवार यांनी सभा घेतली. या सभेला चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदू नागरकर, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, माजी जिल्हाध्यक्ष सुभाषसिंह गौर, युवक काँग्रेस अध्यक्ष शिवा राव, असंघटीत कामगार विभाग शहर अध्यक्ष अनिल सुरपाम, अमजद अली, नगरसेवक शालिनी भगत, सुनिता अग्रवाल, राजेश अड्डूर आदी उपस्थित होते.
मजदूर काँग्रसेतर्फे शेतकरी कामगार मेळावा
प्रदेश काँग्रेसने राज्य सरकारच्या विरोधात जनआक्रोश आंदोलनाची घोषणा केल्यानंतर माजी खासदार नरेश पुगलिया यांनी विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या वतीने ६ नोव्हेंबरलाच न्यू इंग्लिश हायस्कूलच्या ग्राऊंडवर शेतकरी कामगार मेळाव्याच्या आयोजनाची घोषणा केली. मात्र जिल्हा पोलीस प्रशासनाने विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या कामगार मेळाव्याची परवानगी नाकारल्यामुळे सदर मेळावा इंदिरा गांधी गार्डन स्कूलच्या मैदानावर आयोजित करण्यात येत आहे. विदर्भ किसान मजदूर काँग्रेसनेसुद्धा कामगार मेळाव्याची जय्यत तयारी सुरु केली आहे. या मेळाव्याला विशेष अतिथी म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सतिश चतुर्वेदी, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी मंत्री नितीन राऊत, माजी मंत्री अनिस अहमद, माजी मंत्री वसंत पुरके, माजी आमदार गेव्ह आवारी, माजी खासदार मारोतराव कोवासे, आ. सुनील केदार, आ. अमर काळे. आ. गोपाल अग्रवाल, अशोक धवड, माजी आमदार प्रभाकर मामूलकर, माजी आमदार बाबुराव वाघमारे आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती चंद्रपूर शहर जिल्हा कॉग्रेसचे अध्यक्ष गजानन गावंडे यांनी दिली.

Web Title: The City of Shock Movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.