शिल्पकार राम सुतार यांचा नागरी सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 10:45 PM2019-03-04T22:45:20+5:302019-03-04T22:45:39+5:30
जगविख्यात शिल्पकार पद्मभूषण राम सुतार यांचा सुतार समाजाच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जगविख्यात शिल्पकार पद्मभूषण राम सुतार यांचा सुतार समाजाच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, आ.नाना श्यामकुळे, आ. संजय रायमूलकर, महापौर अंजली घोटेकर, प्रदीप जाणवे, किशोर जोरगेवार, मनीष कायरकर, रमेश वनकर आदी उपस्थित होते. यावेळी ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, पद्मभूषण राम सुतार हे संपूर्ण देशाचे भूषण असून त्यांच्या या मार्गदर्शनात चंद्रपूर जिल्ह्यामध्येदेखील एक सुंदर स्मारक उभे राहावे, अशी आपली इच्छा आहे. त्यासाठी राम सुतार यांनी आपला वेळ द्यावा, अशी आग्रही विनंती त्यांनी केली. पद्मभूषण राम सुतार हे जे.जे आर्ट स्कूल मधून शिक्षण घेऊन जग विख्यात शिल्पकार म्हणून नावलौकिकास आलेत. सरदार वल्लभभाई पटेल यांचा नर्मदा सरोवरात उभा राहिलेला जगातला सर्वात उंच पुतळा असो वा संसद परिसरातील महापुरुषांचे पुतळे असोत त्यांच्या पुढे संपूर्ण देश नतमस्तक आहे.