जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नागरी सेवा दिन
By admin | Published: April 22, 2017 01:09 AM2017-04-22T01:09:59+5:302017-04-22T01:09:59+5:30
नागरी सेवा दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्ली
चंद्रपूर : नागरी सेवा दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्ली येथून प्रक्षेपित झालेल्या मार्गदर्शनाचा शुक्रवारला लाभ घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात नागरी सेवा दिनाचे आयोजन केले होते. यावेळी दूरदर्शनवरील या भाषणाचा लाभ अधिकाऱ्यांनी घेतला.
नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात नागरी सेवा दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे देशभर प्रक्षेपण करण्यात आले. प्रधानमंत्र्याचे विशेष मार्गदर्शन या कार्यक्रमाचे वैशिट्य होते. महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी या भाषणाचा लाभ घेतला. विशेष म्हणजे जालना जिल्ह्याने प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये उत्कृष्ट काम केले असून संपूर्ण देशामध्ये या उपक्रमात पहिला क्रमांक पटकावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जालन्याचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांना विशेष पुरस्कार देण्यात आला. या कौतुक सोहळयाचे साक्षिदार देखील चंद्रपूरचे अधिकारी-कर्मचारी झाले होते. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्त, नियोजन व वनेमंत्री सुधीर मुनगंटीवार, मुख्य सचिव सुमीत मलिक यांनी मंत्रालयात विविध विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना या दिनाचे औचित्य साधून पुरस्कृत केले. चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात चंद्रपूर प्रकल्प अधिकारी एम.आर.दयानिधी, अप्पर जिल्हाधिकारी संजय धिवरे, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांच्यासह सर्व प्रमुख अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)