१ डिसेंबरला नागरी सेवा परीक्षा; निर्बंध लागू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2024 01:28 PM2024-11-30T13:28:46+5:302024-11-30T13:30:31+5:30
Chandrapur : जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर :महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २०२४ जिल्ह्यातील विविध केंद्रांवर १ डिसेंबरला आयोजित करण्यात आली आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये निर्बंध लागू करण्याचा आदेश जिल्हादंडाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी शुक्रवारी (दि. २९) यांनी केला.
१ डिसेंबर २०२४ रोजी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी १०० मीटर परिसरांतर्गत सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत परीक्षार्थी व्यतिरिक्त २ किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्रित जमा होणार नाहीत. परिसरात नियमित व रोजचे वाहतूकव्यतिरिक्त इतर कोणत्याही हालचालींना प्रतिबंध राहील.
झेरॉक्स, फॅक्स, एस.टी.डी. बूथ, पेजर, मोबाइल फोन, ई-मेल, इंटरनेट सवलती किंवा इतर कोणत्याही कॉम्युनिकेशन सवलतींना प्रतिबंध राहील. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध प्रचलित कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असे जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद आहे.
अशी आहेत परीक्षा केंद्रे
विद्याविहार हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय तुकुम, सरदार पटेल महाविद्यालय गंजवॉर्ड, बी.जे.एम. कार्मेल अकादमी तुकुम, रफी अहमद किदवाई मेमो हायस्कूल घुटकाळा वॉर्ड, सेंट मायकल इंग्लिश स्कूल नगीनाबाग, बजाज पॉलिटेक्निक बालाजी वॉर्ड, माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूल चंद्रपूर, मातोश्री विद्यालय तुकुम, चांदा पब्लिक स्कूल रामनगर, भवान - जीभाई चव्हाण हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मुल रोड, चंद्रपूर.