स्वच्छ सर्वेक्षण लीग स्पर्धेची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 12:55 AM2019-06-14T00:55:58+5:302019-06-14T00:57:24+5:30
१२ जून २०१४ पासून सुरु झालेल्या स्वच्छता मोहिमेत चंद्र्रपूर शहर सहभागी झाले. यामध्ये उत्कृष्ट कामगिरीही केली. आता स्वच्छ सर्वेक्षण लीग २०२० स्पर्धेची तयारी सुरू झाली. यासंदर्भातील तयारीचा आढावा घेण्यासाठी आयुक्त संजय काकडे यांच्या उपस्थितीत बुधवारी स्थायी समिती बैठक पार पडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : १२ जून २०१४ पासून सुरु झालेल्या स्वच्छता मोहिमेत चंद्र्रपूर शहर सहभागी झाले. यामध्ये उत्कृष्ट कामगिरीही केली. आता स्वच्छ सर्वेक्षण लीग २०२० स्पर्धेची तयारी सुरू झाली. यासंदर्भातील तयारीचा आढावा घेण्यासाठी आयुक्त संजय काकडे यांच्या उपस्थितीत बुधवारी स्थायी समिती बैठक पार पडली.
स्वच्छ सर्वेक्षण लीग २०२० च्या अनुषंगाने सेवा पातळीवरील प्रगती, थेट निरीक्षण, नागरिकांकडून प्रतिसाद आणि प्रमाणीकरण यासंदर्भात जे नवीन निकष शासनातर्फे लागू केले गेले आहेत. त्यादृष्टीने मनपा अधिकारी कर्मचाऱ्यांनी कशी तयारी करावी, यासंदर्भात आयुक्त काकडे यांनी मार्गदर्शन केले.
मागील वर्षी स्वच्छ सर्वेक्षणात शहराने विदभार्तून प्रथम, महाराष्ट्रातून तिसरा तर संपूर्ण देशातून २९ वा क्रमांक पटकाविला होता. एवढेच नाही तर ३ ते १० लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये (मध्यम शहर) नागरिकांच्या प्रतिक्रिया (सिटीझन फीडबॅक) या घटकात चंद्रपूर शहराने देशातून प्रथम क्रमांक पटकाविला होता.
स्वच्छ सर्वेक्षण २०२० हे स्वच्छ सर्वेक्षणाचे हे पाचवे वर्षे आहे. देशाच्या शहरी भागातील स्वच्छता परिणामांची सातत्यपूर्णता सुनिश्चित करण्यासाठी यंदा सर्वेक्षण शेवटी न करता दर तीन महिन्याला करण्यात येणार आहे. एप्रिल ते जून, जुलै ते सप्टेंबर, आॅक्टोबर ते डिसेंबर २०१९ असे तीनदा स्वच्छताविषयक कामांचे मूल्यमापन केले जाणार आहे. शहरातील सार्वजनिक स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यासाठी नगरविकास मंत्रालयाने २०१४ मंधे स्वच्छ सर्वेक्षणाची सुरवात केली होती.
देशपातळीवरील हे सर्वेक्षण नावीन्यपूर्ण पद्धतीने व विहित कालमर्यादेत पार पाडण्यात येते. नागरिकांना मोठ्या प्रमाणात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
निकोप स्पर्धेला उत्तेजन
शहरे अधिक स्वच्छ तसेच नागरी संस्थांतर्फे दिल्या जाणाºया सेवांच्या दर्जामध्ये सुधारणा करून शहरांमध्ये निकोप स्पर्धेला उत्तेजन देण्यात येणार आहे. यावेळी उपायुक्त गजानन बोकडे, सहायक आयुक्त धनंजय सरनाईक, शितल वाकडे, सचिन पाटील, शहर अभियंता महेश बारई, मुख्य लेखाधिकारी मनोज गोस्वामी, वैद्यकीय अधिकारी स्वच्छता नितीन कापसे व कर्मचारी उपस्थित होते.